महिला बचत गटांसाठी ई-बिझनेस प्लॅटफॉर्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:18 IST2021-01-22T04:18:02+5:302021-01-22T04:18:02+5:30

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या लोकसंचलित साधन केंद्रांची पाहणी तसेच बचत गटांच्या महिलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्या दोन दिवसांच्या ...

E-business platform for women's self-help groups | महिला बचत गटांसाठी ई-बिझनेस प्लॅटफॉर्म

महिला बचत गटांसाठी ई-बिझनेस प्लॅटफॉर्म

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या लोकसंचलित साधन केंद्रांची पाहणी तसेच बचत गटांच्या महिलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्या दोन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर आहेत. दरम्यान, गुरुवारी अकोला शहरातील डाबकी रोडस्थित लोकसंचलित साधन केंद्र येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. तत्पूर्वी त्यांनी तेजस्विनी वस्तू विक्री केंद्राचे उद‌्घाटन केले. सध्या प्लास्टिक बंदी असून, कापडी पिशव्यांची मागणी वाढली आहे. त्यामुळे यंत्रसामग्रीसाठी अडीच कोटींचा निधी पर्यावरण मंत्रालयाकडून आम्हाला प्राप्त झाला आहे. त्यामुळे महिलांना आणखी रोजगार मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मविमला यंदा देशपातळीवर दोन पुरस्कार मिळाले असून, एक राज्य पुरस्कार मिळाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. महिलांच्या उन्नतीसाठी बचत गटांना प्राधान्य देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. दोन दिवसांच्या दौऱ्यात पातूर तालुक्यातील अंबाशी येथे भेट देऊन त्यांनी बचत गटांचा आढावा घेतला. पत्रकार परिषदेला जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, जिल्हा समन्वयक वर्षा खोब्रागडे यांच्यासह नाबार्डच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

Web Title: E-business platform for women's self-help groups