विदर्भस्तरीय कॅरम स्पर्धेत दुर्गेश व शेख नजीरमध्ये चुरशीची लढत

By Admin | Updated: August 31, 2014 00:18 IST2014-08-31T00:16:59+5:302014-08-31T00:18:05+5:30

अकोला येथे सुरू असलेल्या विदर्भस्तरीय कॅरम स्पर्धेतील उपान्त्यफेरीत नागपूरचे वर्चस्व कायम

Durgesh and Shaikh Nazir fought a tough fight in the VidarbhaStory carrom tournament | विदर्भस्तरीय कॅरम स्पर्धेत दुर्गेश व शेख नजीरमध्ये चुरशीची लढत

विदर्भस्तरीय कॅरम स्पर्धेत दुर्गेश व शेख नजीरमध्ये चुरशीची लढत

अकोला: विदर्भ कॅरम अकादमीच्या सभागृहात सुरू असलेल्या विदर्भस्तरीय कॅरम स्पर्धेत नागपूरच्या खेळाडूंचे वर्चस्व कायम आहे. नागपूरच्या दुर्गेश पांडे व शेख नजीर शेख बाबू यांच्यात अत्यंत चुरशीची लढत झाली. उत्कंठावर्धक झालेल्या या लढतीत दुर्गेशने २५-९,२५-१५ अशा गुणांनी विजय मिळवून मिळविला.
शनिवार ३0 ऑगस्ट रोजी विदर्भ राज्य व आंतरजिल्हा कॅरम स्पर्धेत सकाळच्या सत्रात झालेल्या उप-उपान्त्यफेरीत दुर्गेश पांडे व शेख नजीरमध्ये उत्कंठावर्धक लढत प्रेक्षकांना पाहायला मिळाली. शेख नदीम गुलाम अहमद व फैजल बुधवाणी यांच्यात एकतर्फी लढत झाली. शेख नदीमने २५-0,२५-0 अशी लढत जिंकली. प्रदीप राठौड व सुमित परदेसी यांच्यातील लढतीचा निकाल २५-५,२५-९ असा लागला. सौरभ सांगोले व प्रतीक पांडे यांनी सुंदर खेळप्रदर्शन केले. ही लढत सौरभने २५-९,२५-१२ अशी जिंकली. याच गटातील उपान्त्यफेरीत सौरभने प्रदीपचा २५-६,२५-२0 असा पराभव केला. दुर्गेशने नदीमला २५-१,२५-४ अशी मात देऊन अंतिम फेरीत प्रवेश निश्‍चित केला.
ज्युनिअर गर्ल्स एकेरीच्या उपान्त्य फेरीत चंदा शास्त्री हिने अकोल्याच्या अनम खान हिचा २५-५,२५-१0 असा पराभव केला. तर श्रद्धा शर्मा हिने मेघा बंग हिचा २५-0,२५-४ असा पराभव केला. सब-ज्युनिअर गर्ल्स उपान्त्यफेरीत अमिता ठोसरे हिने अबोली पाटील वर २५-२,२५-१ अशी मात केली. अदिती क्षीरसागर हिने पूजा लाडखेडकर हिच्यावर२५-0,२५-0 असा एकतर्फी विजय मिळविला. सब-ज्युनिअर बॉईज गटात दीपक पाटील याने आयुष राठीवर २५-१२,२५-१२ असा विजय मिळविला. नीलाक्ष चव्हाण याने सुयोग नालिंदे याचा २५-३,२५-२ असा पराभव केला.
युश बॉईज गटात विक्की साखरे याने विजय जोशी याचा २५-६,२५-७ असा पराभव केला. मोनिष मेश्रामने राजू अंभोरेचा २५-५,२५-१0 ने पराभव केला. युथ गर्ल्समध्ये नम्रता जोशी हिने अंजली वाघ हिला २५-६,२५-९ असे पराभूत केले. कॅडेट बॉईज गटात पीयूष उके याने साईकृष्ण दहिकरवर २५-४,२५-९ मात केली. यश दुबे याने अनुज सातवचा २५-५,२५-१0 असा पराभव केला. कॅडेट गर्ल्स मध्ये गायत्री येलवणकर हिने चिन्मयी घोटीकर हिला २५-६,२५-८ अशा गुणांनी हरविले. श्रेया अग्रवाल हिने गरिमा जालान हिला २५-१0,२५-३ ने पराभूत केले. स्पर्धेचा समारोप उद्या रविवार ३१ ऑगस्ट रोजी दुपारी ३.३0 वाजता आमदार गोपीकिसन बाजोरिया व माजी क्रीडा राज्यमंत्री खान मो.अजहर हुसैन यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे

Web Title: Durgesh and Shaikh Nazir fought a tough fight in the VidarbhaStory carrom tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.