इसमाचा नदीत बुडून मृत्यू
By Admin | Updated: June 1, 2014 22:39 IST2014-06-01T19:27:20+5:302014-06-01T22:39:03+5:30
दोनद बु येथे आसरा मातेच्या दर्शनासाठी आलेल्या ३८ वर्षीय इसमाचा नदीत बुडून मृत्यू.

इसमाचा नदीत बुडून मृत्यू
दोनद बु. : आसरा मातेच्या दर्शनासाठी आलेल्या ३८ वर्षीय इसमाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पिंजर पोलिस स्टेशनांतर्गत येणार्या दोनद बुद्रूक येथे रविवार, १ जून रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. मृतकाचे नाव चक्र धर बळीराम राजूकर असे असून, तो अमरावती जिल्ह्यातील विर्शी गावचा रहिवासी असल्याचे कळले आहे.
अमरावती जिल्ह्याच्या विर्शी येथील चक्रधर राजूकर हे दोनद बुदू्रक येथे आसरा मातेच्या दर्शनासाठी आले असता नदीवर पोहण्यासाठी गेले; परंतु नदीच्या खोल पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला.