गुरुपौर्णिमेनिमित्त पोहरादेवीत भाविकांची मांदियाळी

By Admin | Updated: July 31, 2015 23:59 IST2015-07-31T23:59:17+5:302015-07-31T23:59:17+5:30

पोहरादेवी येथील भव्य कार्यक्रमात रामराव महारांजांचे पावसासाठी देवाला साकडे.

Due to Guru Purnima celebrations, there are devotees of Poharadevi | गुरुपौर्णिमेनिमित्त पोहरादेवीत भाविकांची मांदियाळी

गुरुपौर्णिमेनिमित्त पोहरादेवीत भाविकांची मांदियाळी

मानोरा ( जि. वाशिम): गुरुपौणिमेच्या दिवशी गुरुपूजन सोहळा तथा रामराव महाराजांच्या ८0 व्या वाढदिवसानिमित्त देशभरातील हजारो भाविक श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे आले होते. यावेळी संत डॉ. रामराव महाराज यांनी बळीराजाला सुखी करण्यासाठी देशभर पाऊस येवू दे, असे साकडे देवाला घातले.
संत डॉ.रामराव महाराज आश्रमाच्या परिसरात आयोजित कार्यक्रमाच्या मंचकावर माजी आमदार अनंतकुमार पाटील, कर्नाटकचे माजी मंत्री रेवू नायक, आंध्रचे बद्या नायक, डॉ. शाम जाधव, पं.स.सदस्य अशोक चव्हाण, बाबुसिंग महाराज, बलदेव महाराज, संजय महाराज, राजुदास महाराज, आदि मान्यवर मंचकावर उपस्थित होते.
यावेळी रामराव महाराज म्हणाले की, राज्यकर्त्यांंची अजब निती आहे. क्रिकेट खेळाडूंना कोट्यवधी रुपये देतात मात्र देशाच्या पोशिंद्याकडे दुर्लक्ष करतात, बळीराजा खूप खचला आहे. त्यालाही बळ देण्याचे काम शासनाने करावे. गुरुपुजन सोहळा हा गुरुशिष्यासाठी खूप महत्वाचा सण आहे. या दिवशी मला आपणाकडून गुरु दक्षिणा म्हणून आपण आपल्यातील वाईट व्यसन मला द्यावे व व्यसन मुक्तजीवन जगावे, मानवात अहंकार हे फार वाईट दुगरुण आहे. त्याचा सुध्दा त्याग करावा, देश संकटात आहे. देशात अराजकता माजविण्याचे काम काही लोक करीत आहे. त्यांचे मनसुबे हाणून पाडण्यासाठी यंत्रणा सुध्दा सज्ज आहे. यावेळी कर्नाटकाचे माजी मंत्री रेवू नाईक, यांनी आपले मनोगत व्यक्त करताना अंधश्रध्देतून बाहेर पडण्याचे अवाहन त्यांनी केले.

Web Title: Due to Guru Purnima celebrations, there are devotees of Poharadevi