शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

रस्त्याचा निधी वळविला, कंत्राटदाराच्या देयकासाठी दबाव; जी. श्रीकांत यांच्यावर कारवाई करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 1:27 AM

अकोला : जिल्हय़ातील निमकर्दा-मोरगाव या रस्त्याचा निधी वळता करून दुसराच रस्ता बांधण्यात आला, तसेच घरकुलांचा लाभ अद्याप लाभार्थींना देण्यात आला नसताना कंत्राटदाराच्या देयकासाठी मूर्तिजापूर नगरपालिका मुख्याधिकार्‍यावर दबाव आणल्याने, यासंदर्भात सखोल चौकशी करून तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आमदार रणधीर सावरकर व आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी शनिवारी जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) सभेत केली.

ठळक मुद्दे‘डीपीसी’ सभा : रणधीर सावरकर, गोपीकिशन बाजोरिया यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हय़ातील निमकर्दा-मोरगाव या रस्त्याचा निधी वळता करून दुसराच रस्ता बांधण्यात आला, तसेच घरकुलांचा लाभ अद्याप लाभार्थींना देण्यात आला नसताना कंत्राटदाराच्या देयकासाठी मूर्तिजापूर नगरपालिका मुख्याधिकार्‍यावर दबाव आणल्याने, यासंदर्भात सखोल चौकशी करून तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आमदार रणधीर सावरकर व आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी शनिवारी जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) सभेत केली.निमकर्दा-मोरगाव रस्त्याचा निधी वळता करून दुसराच रस्ता बांधण्यात आला. जिल्हा नियोजन समितीची मंजुरी न घेता रस्त्याचे काम करण्यात आल्याचा मुद्दा महापौर विजय अग्रवाल यांनी ‘डीपीसी’च्या सभेत उपस्थित केला. ‘डीपीसी’ची मान्यता नसताना तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या मौखिक आदेशावरून रस्त्याचा निधी वळता करण्यात आला व दुसर्‍याच रस्त्याचे काम करण्यात आले. त्यामुळे यासंदर्भात तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आ. रणधीर सावरकर यांनी सभेत केली. तसेच जिल्हय़ातील बाळापूर, मूर्तिजापूर व पातूर येथे सन २00८-0९ मध्ये बांधण्यात आलेल्या घरकुलांचा लाभ अद्यापही लाभार्थींना मिळाला नसून, घरकुले रिकामी पडली आहेत. त्यामुळे संबंधित लाभार्थींना घरकुलांचा तातडीने लाभ देण्यात यावा, अशी मागणी आ. गोपीकिशन बाजोरिया यांनी सभेत केली. या मुद्यावरील चर्चेत घरकुलांचा लाभ लाभार्थींना देण्यात आला नसताना संबंधित कंत्राटाराचे देयक देण्यासाठी मूर्तिजापूर नगरपालिका मुख्याधिकार्‍यावर तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दबाव आणल्याची बाब समोर आल्याने, यासंदर्भात तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्यासह संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी आ. गोपीकिशन बाजोरिया व आ. रणधीर सावरकर यांनी सभेत केली.

‘डीपीसी‘ची मान्यता न घेता, तत्कालीन जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्या मौखिक आदेशानुसार निमकर्दा-मोरगाव रस्त्याचा निधी दुसर्‍या रस्त्याच्या कामावर वळता करण्यात आला. त्यामुळे मनमानी पद्धतीने रस्त्याचे काम बदलण्यात आल्याने यासंदर्भात तत्कालीन जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मी ‘डीपीसी’च्या सभेत केली.-आ. रणधीर सावरकर.

जिल्हय़ातील बाळापूर, मूर्तिजापूर व पातूर येथे बांधण्यात आलेल्या घरकुलांचा लाभ अद्याप लाभार्थींना देण्यात आला नाही. त्यामुळे घरकुलांचा लाभ लाभार्थींना तातडीने देण्यात यावा आणि घरकुलांचा लाभ लाभार्थींना मिळाला नसताना, कंत्राटदाराचे देयक देण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दबाव आणल्याचे मूर्तिजापूर नगरपालिका मुख्याधिकार्‍यांनी मान्य केले. त्यामुळे यासंदर्भात तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत व संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी ‘डीपीसी’ सभेत केली.-आ.गोपीकिशन बाजोरिया.

 

टॅग्स :Akola District Collector officeअकोला जिल्हाधिकारी कार्यालयcollectorतहसीलदार