विहिरीत बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू

By Admin | Updated: June 13, 2017 00:33 IST2017-06-13T00:33:44+5:302017-06-13T00:33:44+5:30

वरुळ जऊळका येथील घटना

Due to drunken drown the student's death | विहिरीत बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू

विहिरीत बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
वरूर जऊळका: विहिरीत पोहताचा बुडाल्याने १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना १२ जून रोजी दुपारी वरुळ जऊळका येथे घडली. विद्यार्थी बुडाल्याची माहिती मिळताच संतनगरी आपत्कालीन बचाव पथक मुंडगाव आणि अकोट येथील काही युवकांनी गावातील नागरिकांच्या सहकार्याने शोधमोहीम राबवली. सात तासांनी विद्यार्थ्याचे प्रेत शोधण्यात पथकाला यश आले.
गावातील आकाश अजाबराव लाखे (१७) हा युवक १२ जून रोजी दुपारी वरुर येथील सार्वजनिक विहिरीत पोहण्यासाठी गेला होता. आकाशने विहिरीत उडी घेतल्यानंतर तो वर आलाच नाही. त्यामुळे, त्याच्या मित्रांनी आरडाओरडा केली. गावातील ग्रामस्थांनी विहिरीजवळ एकच गर्दी केली. गावातील सामाजिक कार्यकर्ते अनिल शर्मा यांनी याविषयी तलाठी, मंडळ अधिकारी व दहीहांडा पोलीस स्टेशनला माहिती दिली. मुंडगाव येथील संतनगरी आपत्कालीन पथकाने विद्यार्थ्याचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू केली. तब्बल सात सातांनी आकाशचा मृतदेह सापडला. आकाश हा आई-वडिलांना एकुलता एक होता. तसेच आकाशच्या आई-वडिलांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. आकाशचा मृतदेह शोधण्यासाठी संतनगरी आपत्कालीन पथकाला गावातील वासुदेव पडोळे, सुधाकर रामेकर,अभिजित कात्रे, संजय कात्रे, धीरज सिरसाट, गजानन वानखडे, ज्ञानेश्वर पाचपोहे, अनिल शर्मा, विनोद नायसे आदींनी शोधकार्य केले.

Web Title: Due to drunken drown the student's death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.