शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
3
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
4
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
5
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
6
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
7
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
8
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
9
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
10
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
11
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
12
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
13
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
14
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
15
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
16
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
17
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
18
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
19
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
20
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...

पुणे-हाटिया एक्स्प्रेसमध्ये झाली महिलेची प्रसूती!

By admin | Updated: February 17, 2017 02:45 IST

महिला व बाळ स्त्री रुग्णालयात.

राम देशपांडे अकोला, दि. १६- पुणे-हाटिया एक्स्प्रेसने प्रवास करीत असलेल्या महिलेची प्रसूती झाल्याची घटना बुधवारी मध्य रेल्वे मार्गावरील मलकापूर रेल्वेस्थानकाजवळ घडली. स्टॉपेजेस कमी असल्याने भुसावळनंतर थेट अकोल्यात थांबलेल्या या गाडीतील बाळ-बाळांतिणीला द.म. रेल्वेच्या आरोग्य सेवकांनी तत्काळ अकोला स्त्री रुग्णालयात हलविले.धावत्या रेल्वेत प्रसूत झालेली नीता मदनलाल कुलमित्र ही महिला तिच्या पतीसह २२८४५ पुणे-हटिया एक्स्प्रेने छत्तीसगढ-मुंगेली या मूळ गावी जात होती. नऊ महिने पूर्ण भरत आलेले असताना प्रवास करणार्‍या नीताला मलकापूर रेल्वेस्थानकाजवळ कळा सुरू झाल्या. तत्काळ तिची प्रसूती झाली. माहिती मिळताच अशा परिस्थितीत रेल्वे प्रशासनाने १0८ क्रमांकावर पूर्वसूचना देऊन ही गाडी शेगावस्थानकावर थांबविणे अपेक्षित होते; मात्र भुसावळनंतर थेट अकोल्याला थांबा असल्यामुळे रेल्वे प्रशासनाला सदर निर्णय घेता आला नाही. अखेर रात्री १0 वाजता अकोला रेल्वेस्थानकावर पोहोचल्यानंतर बाळ-बाळंतिणीला अकोला स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच दक्षिण मध्य रेल्वेच्या आरोग्य सेवकांनी रेल्वेस्थानकावर धाव घेतली. यामध्ये आरोग्यसेविका ममता कांबळे, रमाबाई, तुषार काळेकर, जय नारायण व डॉ. जगदीश खंदेतोड यांनी परिस्थिती हाताळून तिला स्त्री रुग्णालयात हलविले. रेल्वे प्रवासादरम्यान प्रकृती अस्वास्थ्यामुळे एखाद्या रेल्वे प्रवाशाचा जीव अक्षरश: टांगणीला लागतो. अशा अचानक उद्भवलेल्या परिस्थितीत जवळ येत असलेल्या रेल्वेस्थानकावर थांबा नसतानासुद्धा गाडी थांबविण्याचा अधिकार रेल्वे चालकास द्यायला हवा. अशा प्रसंगी १0८ वर पूर्वसूचना देऊन रुग्णवाहिकेच्या साहाय्याने अत्यावस्थेतील रुग्णाला रुग्णालयापर्यंत पोहोचविले जाऊ शकते. अशा प्रसंगी प्रवाशांच्या सुविधेसाठी भारतीय रेल्वे प्रशासनाने असे काही महत्त्वपूर्ण बदल करणे गरजेचे असल्याचे मत ह्यलोकमतह्णला माहिती देताना रेल्वेच्या अधिकृत सूत्रांनी व्यक्त केले.