शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
2
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
3
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
4
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
5
सिंधुदुर्गात राणेंचं पाऊल पुढे, तर या दोन मतदरासंघांचा कल राऊतांकडे; तळकोकणात कोण जिंकणार?
6
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
7
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
8
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
10
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
11
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
12
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
13
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
14
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
15
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
16
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
17
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड
18
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
19
Storage Technologies and Automation : पहिल्याच दिवशी शेअरची किंमत दुप्पट; ₹७८ चा 'हा' स्टॉक पोहोचला ₹१५५ पार
20
भर चौकात महिलेने घातला गोंधळ, रस्त्यावरच उतरवायला लागली कपडे, पोलिसांशी घातला वाद. अखेर...  

धक्कादायक : औषध विभागाने संचारबंदी काळात फिरण्यासाठी अनेकांना दिली ओळखपत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 11:34 AM

अनेकांकडून पैसे घेऊन ओळखपत्र वाटप केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

- सचिन राऊत

अकोला : कोरोना संसर्गजन्य विषाणूला आळा घालण्यासाठी राज्य शासनासह जिल्हाधिकारी व मोठे अधिकारी रात्रंदिवस काम करीत असतानाच अन्न व औषध प्रशासन विभागातील अकोला औषध विभागाच्या अधिकाऱ्यांना मात्र कोरोनाचे काहीही गांभीर्य नसल्याचे वास्तव आहे. औषध विभागाच्या अधिकाºयांचे शिक्के एका चंदू नामक खासगी व्यक्तीला देऊन त्याने संचारबंदी काळात शहरात वावरण्यासाठी अनेकांकडून पैसे घेऊन ओळखपत्र वाटप केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावरून औषध विभागाच्या अधिकाºयांनीच संचारबंदीचा फज्जा उडविला असून, त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी होत आहे.राज्यात संचारबंदी लागू केल्यानंतर या काळात अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे. यामध्ये माध्यम, आरोग्य, वैद्यकीय, औषधी दुकान, किराणा, भाजीपाला, दूध या व्यावसायिकांना संचारबंदीमध्ये बाहेर निघण्यासाठी एक विशिष्ट ओळखपत्र संबंधित विभागाने देऊन फिरण्यास मुभा दिली आहे; मात्र अन्न व औषध विभागाच्या अधिकाºयाने त्यांचा शिक्का ओळखपत्र बनविण्यासाठी सोमवारी एका चंदू नामक व्यक्तीकडे दिला. सदर व्यक्तीने या शिक्क्यावरून वाट्टेल त्याला ओळखपत्र बनवून दिल्याने संचारबंदीचा फज्जा उडविला. यावरून औषध विभागाच्या अधिकाºयांना सदर प्रकरणाचे गांंभीर्य नसल्याचे दिसून येत असल्याने केमिस्ट असोसिएशननेही विरोध दर्शविला आहे; मात्र त्यानंतरही सोमवारी रात्री उशिरापर्यंत ओळखपत्र देण्याचा सपाटा सुरूच होता. मेडिकलवरील कारवाई संशयातगोरक्षण रोडवरील एका मेडिकल मधून बनावट सॅनिटायझर औषध विभागाने जप्त केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे; मात्र यामध्ये सेटिंग झाल्याची चर्चा असून, बनावट सॅनिटायझर विक्री करणाºयावर कारवाई केल्यानंतरही ही कारवाई दडपल्याचे वास्तव आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी समोर येत नसल्याने सदर कारवाईची माहिती देण्यात येत नसल्याचे अधिकाºयांचे म्हणणे आहे; मात्र यावरून औषध विभागाच्या अधिकाºयांनी कोरोनाच्या या दहशतीतही काळाबाजार करणाºयांवर थातूरमातूर कारवाई केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.याबाबत कोणतेही अधिकारी बोलायला तयार नाहीत. केमिस्ट असोसिएशनही हतबलकेमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनकडे जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांची अधिकृत यादी आहे. त्यांच्या अधिकृत सदस्यांची एक यादी केमिस्ट असोसिएशनने औषध विभागाच्या अधिकाºयांना देण्याचे कबुल केले. त्यानंतर या यादीनुसार ओळखपत्र देण्यासाठी त्यांनी आग्रह धरला; मात्र औषध विभागाच्या अधिकाºयाने काहीही न ऐकता खासगी व्यक्तीच्या माध्यमातून संचारबंदी काळात फिरण्यासाठी वाट्टेल त्याला ओळखपत्र दिले. यावरून सदर अधिकाºयास एवढ्या गंभीर परिस्थितीचे काहीही देणे-घेणे नसल्याचे दिसून येत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाFDAएफडीए