शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पातूर तालुक्यात दुष्काळाच्या झळा; १६ कुटुंबांनी सोडले गाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 00:32 IST

पातूर तालुक्यातील गावातील शेती आणि शेतमजुरीचा पारंपरिक व्यवसाय दुष्काळामुळे संपुष्टात आल्याने भंडारज बु.च्या १६ कुटुंबातील ७६ शेतकरी व शेतमजुरांनी जड अंत:करणाने गाव सोडले. पोटाची खळगी भरण्यासाठी पुणे, मुंबई, हैदराबाद आणि सुरतच्या दिशेने स्थलांतर केल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देरोजगाराच्या शोधात भंडाराज बु. च्या ग्रामस्थांची धाव

संतोषकुमार गवई । लोकमत न्यूज नेटवर्कशिर्ला : पातूर तालुक्यातील गावातील शेती आणि शेतमजुरीचा पारंपरिक व्यवसाय दुष्काळामुळे संपुष्टात आल्याने भंडारज बु.च्या १६ कुटुंबातील ७६ शेतकरी व शेतमजुरांनी जड अंत:करणाने गाव सोडले. पोटाची खळगी भरण्यासाठी पुणे, मुंबई, हैदराबाद आणि सुरतच्या दिशेने स्थलांतर केल्याची माहिती आहे.भंडारज बु.सह संपूर्ण तालुक्यात  यावर्षी अत्यल्प प्रमाणात पाऊस पडला. शेतकर्‍यांनी शेतात पेरलेल्या उडीद, मूग, सोयाबीन पिकाचे पावसाअभावी कमालीचे नुकसान झाले. अनेकांना एकरी केवळ २0 किलो सोयाबीनचे उत्पादन हातात आले. मशागत, पेरणी, सोंगणीवर केलेला खर्च संपूर्ण वाया गेला. अनेकांना उत्पन्न एक छदामही झाले नाही. त्यामुळे,खर्चाचा संपूर्ण ताळेबंद बिघडला. शेतकरी शेती उत्पन्नाच्या आधारावर शेतमजुरांना शेतात काम देत होता; मात्र हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांच्या खिशात काहीच आले नसल्यामुळे शेतमजुरांचे शेतीतील काम संपुष्टात आले. खरिपातील वाईट अनुभवानंतर रब्बी हंगामात शेतीची पेरणीपूर्व मशागत करून हरभरा, गहू, कांदा बागायती पिके काढण्यासाठी पेरणी केली; मात्र विहिरीतील पाणी पातळी खोल जाऊन सिंचनासाठी आवश्यक पाणीसाठा भूगर्भात राहिला नसल्याने पेरलेली रब्बी पिकेसुद्धा संपुष्टात आली. गतवर्षी विलास जयराम इंगळे यांना २५0 क्विंटल कांदा पीक आले होते. यावर्षी खरीप आणि रब्बी दोन्ही पिके बुडाली. परिणामी, भंडारज बु.च्या अल्पभूधारक शेतकर्‍यांना स्वत:च्या घराला कुलूप लावून बायका-पोरांना घेऊन पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईसह इतर शहरे गाठावी लागली आहे. यामध्ये प्रामुख्याने विलास जयराम इंगळे, दीपक व्यंकट इंगळे, जिझासुमत नारायण इंगळे, सविता बाळू खंडारे (विधवा महिला), रामेश्‍वर वसंता सुरवाडे, माणिक संपत इंगळे (वायरमन), भगवान वानखेडे (गवंडी काम), चंद्रशेखर चौथमल, शेतमजूर, सुधाकर मनोहर तेलगोटे, देवलाल पंजाब भोजने, उमेश साहेबराव सुरवाडे, संदेश भगवान शिरसाट, विनोद रामराव इंगळे, सीमाबाई सीताराम इंगळे, सतीश पंजाब घायवट, विद्याधर साहेबराव सुरवाडे आदींचा समावेश आहे. हे सर्व हरियाणाला गेले. अजय दत्ता अवसरमोल, प्रकाश महादेव गव्हाळे, आकाश उमेश भदे, अजय बाळू अरखराव, विनोद श्रीकृष्ण गव्हाळे, सोपान उकर्डा गव्हाळे, भिकाजी सीताराम इंगळे, प्रमोद रामभाऊ गव्हाळे, अक्षय गजानन भांगे, सतीश माणिकराव इंगळे, प्रवीण केशव इंगळे, संतोष लक्ष्मण इंगळे, बाळू निरंजन सुरवाडे, पंकज महादेव गव्हाळे हे शाळकरी महाविद्यालयीन युवक शिक्षण अध्र्यावर सोडून रोजगाराला गेले आहेत.    भंडारज बु.च्या ७६ हून अधिक कुटुंबांनी घराला कुलूप ठोकून गाव सोडले आहे. उर्वरित शेतकरी शेतमजुरांची कुटुंबे रोजगारासाठी गाव सोडण्याच्या तयारीत आहेत. ही दुरवस्था नेहमी मराठवाड्यात पाहायला मिळते; मात्र पाणीच नसल्याने स्थलांतर करण्याची पातूर तालुक्यातील भंडारज बु. या गावावर पहिल्यांदा वेळ आली आहे. तेच विदारक चित्र तालुक्यातील अनेक गावांचे होण्याची शक्यता अधिक आहे.    

गावातील शेतकरी आणि शेतमजुराला पाणीच नसल्याने रोजगार नाही. शासनाने दुष्काळी परिस्थितीत कामांना तत्काळ सुरू करण्याची गरज आहे, अन्यथा गाव ओस पडणार आहे. शेतीवर आधारित जीवनचक्र दुष्टचक्र बनले आहे. सरकारने जलद गतीने पावले उचलण्याची गरज आहे.- दीपक इंगळे, शेतकरी तथा माजी सरपंच भंडारज बु.

शासनाच्या रोजगार हमी योजनेंतर्गत ८४ कामांना मंजुरी देण्यात आली आहे. लोकांच्या मागणीनुसार कामे उपलब्ध करून देण्यात येतील. पाणीटंचाई आणि चाराटंचाईबाबत गटविकास अधिकारी यांचा अद्यापही कोणताही अहवाल प्राप्त नाही. - डॉ. आर. जी. पुरी, तहसीलदार पातूर.

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणFarmerशेतकरी