शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी मदत तोकडी : हेक्टरी खर्च ४० हजार; मदत केवळ ६८०० रुपये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 10:44 IST

शेती पिकांच्या उत्पादनासाठी हेक्टरी सरासरी ३५ ते ४० हजार रुपयांचा खर्च करावा लागत असताना, त्या तुलनेत पीक नुकसान भरपाईपोटी मिळणारी हेक्टरी ६ हजार ८०० रुपयांची मदत अत्यंत तोकडी ठरत असल्याने, दुष्काळी परिस्थितीत संकटात सापडलेल्या शेतकºयांना या मदतीने दिलासा मिळणार काय, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे

- संतोष येलकर

अकोला: जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त पाच तालुक्यांतील शेतकºयांना दोन हेक्टर मर्यादेपर्यंत हेक्टरी ६ हजार ८०० रुपयांची मदत शासनामार्फत मंजूर करण्यात आली असून, मदत वाटपाच्या पहिल्या हप्त्याची रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया प्रशासनामार्फत सुरू करण्यात आली आहे; परंतु शेती पिकांच्या उत्पादनासाठी हेक्टरी सरासरी ३५ ते ४० हजार रुपयांचा खर्च करावा लागत असताना, त्या तुलनेत पीक नुकसान भरपाईपोटी मिळणारी हेक्टरी ६ हजार ८०० रुपयांची मदत अत्यंत तोकडी ठरत असल्याने, दुष्काळी परिस्थितीत संकटात सापडलेल्या शेतकºयांना या मदतीने दिलासा मिळणार काय, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.राज्यात दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आलेल्या तालुक्यांमधील पीक नुकसान भरपाईपोटी दुष्काळग्रस्त शेतकºयांना दोन हप्त्यांत मदत वाटप करण्यास शासनामार्फत २५ जानेवारी रोजी मान्यता देण्यात आली. त्यानुसार अकोला जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त अकोला, बाळापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा व मूर्तिजापूर या पाच तालुक्यांतील दुष्काळग्रस्त शेतकºयांसाठी ८१ कोटी ५५ लाख ५ हजार ४५६ रुपयांचा मदतनिधी मंजूर करण्यात आला असून, त्यापैकी पहिल्या हप्त्यापोटी ४० कोटी ७७ लाख ७ हजार ७२८ रुपयांचा मदतनिधी प्राप्त झाला आहे. दोन हेक्टर मर्यादेपर्यंत मदतीचे वाटप करण्यात येणार असून, शेती पिकांच्या नुकसान भरपाईपोटी प्रतिहेक्टर ६ हजार ८०० रुपये आणि बहुवार्षिक पीक नुकसान भरपाईपोटी प्रतिहेक्टर १८ हजार रुपयांची मदत दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. कपाशी, सोयाबीन, तूर, मूग व उडीद इत्यादी पिकांच्या उत्पादनासाठी पेरणीपासून काढणीपर्यंत हेक्टरी सरासरी ३५ ते ४० हजार रुपये शेतकºयांना खर्च करावा लागतो. पिकांसाठी केलेला उत्पादन खर्च बघता, पीक नुकसान भरपाईपोटी शासनाकडून जाहीर करण्यात आलेली दुष्काळी मदत संकटात सापडलेल्या शेतकºयांना दिलासा देणारी ठरणार काय, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.पीकनिहाय हेक्टरी असा करावा लागतो खर्च!शेती पिकांच्या उत्पादनासाठी जमिनीची मशागत, पेरणी, खते, कीटकनाशकांची फवारणी, अंतर्गत मशागत वेचणी-काढणी व मजुरीपोटी हेक्टरी सरासरी ३५ ते ४० हजार रुपयांचा खर्च शेतकºयांना करावा लागतो. त्यामध्ये कपाशी पिकासाठी हेक्टरी ४० ते ५० हजार रुपये, सोयाबीन पिकासाठी हेक्टरी ३५ ते ४० हजार रुपये आणि मूग व उडीद पिकासाठी हेक्टरी ३० ते ३५ हजार रुपये खर्च करावा लागतो.दुष्काळी परिस्थितीत शेती पिकांच्या नुकसान भरपाईपोटी दुष्काळग्रस्त शेतकºयांसाठी शासनाकडून जाहीर करण्यात आलेली हेक्टरी ६ हजार ८०० रुपयांची मदत ही तुटपुंजी आहे. संकटात सापडलेल्या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी हेक्टरी किमान २० हजार रुपयांची मदत मिळाली पाहिजे. त्यासाठी शासनाने मदतीच्या रकमेत वाढ केली पाहिजे.- प्रशांत गावंडेशेतकरी जागर मंच, अकोला.पीक नुकसान भरपाईपोटी हेक्टरी ६ हजार ८०० रुपये आणि बहुवार्षिक पीक नुकसान भरपाईपोटी १८ हजार रुपयांची मदत शासनाने जाहीर केली आहे. दुष्काळग्रस्त शेतकºयांसाठी ही मदत दिलासा देणारी आहे.- गणेश कंडारकरजिल्हाध्यक्ष, भाजपा शेतकरी आघाडी.कपाशी, सोयाबीन, मूग व उडीद या पिकांच्या उत्पादनासाठी शेतकºयांना हेक्टरी ३५ ते ४० हजार रुपये खर्च करावा लागतो. त्या तुलनेत पीक नुकसान भरपाईपोटी शासनाने जाहीर केलेली हेक्टरी ६ हजार ८०० रुपयांची मदत दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळणारी असून, या मदतीने संकटात सापडलेल्या शेतकºयांना दिलासा मिळणार नाही.-मनोज तायडेशेतकरी नेता, अकोला.

 

टॅग्स :FarmerशेतकरीAkolaअकोलाagricultureशेतीdroughtदुष्काळ