कृषी विद्यापीठातील लिंबूची झाडे वाळली; तापमानाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 17:40 IST2020-06-08T17:39:26+5:302020-06-08T17:40:28+5:30

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील लिंबूची झाडे या तापमानात वाळली आहेत.

Dried lemon trees at the Agricultural University; Temperature blow | कृषी विद्यापीठातील लिंबूची झाडे वाळली; तापमानाचा फटका

कृषी विद्यापीठातील लिंबूची झाडे वाळली; तापमानाचा फटका

ठळक मुद्दे अकोल्याच्या कमाल तापमानाचा पारा ४७ अंशाच्या वर गेला होता.पाणी दिले तरी बाष्पीभवन होत असल्याने फळ पिके होरपळली आहे.

अकोला : राज्यात सर्वाधिक कमाल तापमान अकोला जिल्ह्यात होते. त्याचा परिणाम फळे, भाजीपाला पिकांवर झाला असून, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील लिंबूची झाडे या तापमानात वाळली आहेत. अकोल्याच्या कमाल तापमानाचा पारा ४७ अंशाच्या वर गेला होता. जगात अकोल्याच्या तापमानाची चौथ्या क्रमांकावर नोंद झाली. त्यामुळे अकोला जिल्हा होरपळला. तापमानामुळे बाष्पीभवन वाढत असून, पाणी दिले तरी जमिनीतील ओलावा कमी होत होता. अनेक भागात पातळी खोल गेली आहे. पाणी दिले तरी बाष्पीभवन होत असल्याने फळ पिके होरपळली आहे. यामध्ये संत्रा, मोसंबी, केळी, आंबा व इतर पिकांवर दुष्परिणाम झाले. अकोला जिल्ह्यात संत्रा लिंबू या या फळपिकाच्या भाजीपाला व इतरही पिकांचे नुकसान झाले आहे. लिंबूची ही झाडे मध्यवर्ती संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावर आहेत. यातील काही झाडे हिरवी असून, बहुतांश जळाली आहेत.

Web Title: Dried lemon trees at the Agricultural University; Temperature blow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.