डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी डॉ. दिलीप मालखेडे

By राजेश शेगोकार | Updated: September 5, 2022 18:00 IST2022-09-05T18:00:07+5:302022-09-05T18:00:46+5:30

याप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते

Dr. Panjabrao Deshmukh Agricultural University Vice Chancellor Malkhede | डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी डॉ. दिलीप मालखेडे

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी डॉ. दिलीप मालखेडे

 अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. विलास भाले यांचा कुलगुरू पदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपन्न झाला. राज्यपालांच्या निर्देशानुसार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. दिलीप मालखेडे यांनी सोमवार, ५ सप्टेंबर रोजी सकाळी अकोला येथील विद्यापीठाचे मुख्यालयी कुलगुरू कार्यालयात संपन्न झालेल्या समारंभात कुलगुरू पदाचा प्रभार कुलगुरू डॉ. भाले यांच्याकडून स्वीकारला.

याप्रसंगी विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ. विलास खर्चे, संचालक शिक्षण डॉ. श्यामसुंदर माने, संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुधीर वडतकर, अधिष्ठाता उद्यानविद्या डॉ. देवानंद पंचभाई, कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे, विद्यापीठ नियंत्रक प्रमोद पाटील यांच्यासह संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, प्रा. डॉ. संजय खडसे, प्रा. डॉ. संतोष बनसोड, प्रा. डॉ. राजीव बोरकर, जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदूरकर, रमेश जाधव यांच्यासह कृषी विद्यापीठातील सर्व सहयोगी अधिष्ठाता, वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ, विभागप्रमुख, अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी कल्याण अधिकारी, मुख्य वसतिगृह अधीक्षकांची उपस्थिती होती. प्रास्ताविक कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे यांनी केले.

Web Title: Dr. Panjabrao Deshmukh Agricultural University Vice Chancellor Malkhede