डॉ. आंबेडकरनगर-यशवंतपूर विशेष रेल्वे गाडी रविवारपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 10:19 IST2021-02-23T10:19:28+5:302021-02-23T10:19:44+5:30

Dr. Ambedkar Nagar-Yesvantpur special train या विशेष गाडीला अकोला स्थानकावर थांबा देण्यात आल्यामुळे अकोलेकरांची सोय झाली आहे.

Dr. Ambedkar Nagar-Yesvantpur special train from Sunday | डॉ. आंबेडकरनगर-यशवंतपूर विशेष रेल्वे गाडी रविवारपासून

डॉ. आंबेडकरनगर-यशवंतपूर विशेष रेल्वे गाडी रविवारपासून

अकोला : प्रवाशांच्या सुविधेकरिता मध्य रेल्वेने डॉ. आंबेडकरनगर (महू) ते यशवंतपूरदरम्यान साप्ताहिक सुपरफास्ट विशेष रेल्वे गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाडीला अकोला स्थानकावर थांबा देण्यात आल्यामुळे अकोलेकरांची सोय झाली आहे.

गाडी क्र. ०९३०१ डाऊन डॉ. आंबेडकरनगर-यशवंतपूर ही विशेष गाडी २८ फेब्रुवारीपासून दर रविवारी रात्री ८ वाजता डॉ. आंबेडकरनगर येथून प्रस्थान करून तिसऱ्या दिवशी यशवंतपूर येथे सकाळी ११ वाजता पोहोचणार आहे. ही गाडी दर सोमवारी सकाळी ११.४० वाजता अकोला स्थानकावर येणार आहे.

गाडी क्र. ०९३०२ अप यशवंतपूर-डॉ. आंबेडकरनगर ही विशेष गाडी २ मार्चपासून दर मंगळवारी यशवंतपूर येथून दुपारी १५.४० वाजता रवाना होऊन तिसऱ्या दिवशी डॉ. आंबेडकरनगर ०७.१५ वाजता पोहोचेल. ही गाडी अकोला स्थानकावर दुपारी ३ वाजता येऊन ०३.१० वाजता डॉ.आंबेडकरनगरकडे रवाना होणार आहे.

Web Title: Dr. Ambedkar Nagar-Yesvantpur special train from Sunday