"डीपीसी" निवडणूक: नऊ जागांसाठी ९८.११ टक्के मतदान!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 19:08 IST2022-08-29T19:07:48+5:302022-08-29T19:08:34+5:30
आज मतमोजणी: १६ उमेदवारांचा होणार फैसला!

"डीपीसी" निवडणूक: नऊ जागांसाठी ९८.११ टक्के मतदान!
संतोष येलकर
अकोला- जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) रिक्त नऊ सदस्य पदांसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात मतदान घेण्यात आले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत ९८.११ टक्के मतदान झाले असून, मंगळवारी होणाऱ्या मतमोजणीत निवडणूक लढविणाऱ्या १६ उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे.
डीपीसीच्या दहा सदस्य पदांसाठी जिल्हा परिषद सदस्यांमधून निवड करण्यासाठी निवडणूक घेण्यात येत आहे. एक जागेवर भाजपच्या एक सदस्याची अविरोध निवड झाल्याने, नऊ पदांसाठी मतदान घेण्यात आले. सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या एकूण ५३ पैकी ५२ सदस्यांनी मतदान केल्याने या निडणुकीत ९८.११ टक्के मतदान झाले. मंगळवार, ३० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजतापासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात मतमोजणी होणार आहे. त्यामध्ये निवडणूक लढविणाऱ्या १६ उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे.
३० महिला, २२ पुरुष
सदस्यांनी केले मतदान!
जिल्हा परिषदेच्या ५३ पैकी ५२ सदस्यांनी मतदान केले. एक सदस्य अनुपस्थित होते. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या ३० महिला सदस्य आणि २२ पुरुष सदस्यांनी मतदान केले.