दार उघडे ठेवून झोपणे पडले महागात
By Admin | Updated: May 31, 2014 21:55 IST2014-05-31T19:42:21+5:302014-05-31T21:55:51+5:30
चोरट्याने घरातील ७५ हजार रुपयांची रक्कम लंपास केली; अकोलातालुक्यातील कळंबेश्वर येथील घटना.

दार उघडे ठेवून झोपणे पडले महागात
अकोला : कळंबेश्वर येथील शेतकर्याला घराचे दार उघडे ठेवून झोपणे चांगलेच महागात पडले. अज्ञात चोरट्याने घरात घुसून घरात ठेवलेली ७५ हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली. ही घटना ३0 मे रोजी रात्रीदरम्यान घडली. या प्रकरणी जुने शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
जुने शहर पोलिस ठाण्यांतर्गत येणार्या कळंबेश्वर येथील प्रशांत तुकाराम निकामे (२९) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ३0 मे रोजी रात्री प्रचंड उकाडा होत असल्याने घराचे दार उघडे ठेवले आणि झोपी गेले. दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात घुसून घरात ठेवलेली ७५ हजार रुपयांची रोख लंपास केली आणि पसार झाला. सकाळी घरी चोरी झाल्याचे लक्षात आल्यावर प्रशांत निकामे यांनी जुने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भादंवि कलम ३८0 नुसार गुन्हा दाखल केला.