शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

अकोल्यातील कॅन्सरग्रस्त चिमुकल्या क्रिशासाठी डॉक्टर बनले देवदूत; मोफत केली शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 2:34 PM

अकोला : बाल शस्त्रक्रिया विशेषतज्ज्ञ डॉ. पराग टापरे, मुत्रविकार तज्ज्ञ डॉ. प्रशांत मुळावकर, भूलतज्ज्ञ डॉ. दीपक भट यांनी क्रिशावर मोफत शस्त्रक्रिया करून एक आदर्श निर्माण केला.

ठळक मुद्देदोन वर्षाच्या चिमुकलीच्या किडनीवर कॅन्सरची गाठ आली. शस्त्रक्रिया करण्यासाठी दीड लाख रुपयांची गरज होती. ‘लोकमत’ने मदतीचा हात उपक्रमांतर्गत चिमुकल्या क्रिशाच्या वेदना समाजासमोर मांडल्या आणि पाहता पाहता शेकडो हात क्रिशाच्या मदतीसाठी पुढे आले. बाल शस्त्रक्रिया विशेषतज्ज्ञ डॉ. पराग टापरे, मुत्रविकार तज्ज्ञ डॉ. प्रशांत मुळावकर, भूलतज्ज्ञ डॉ. दीपक भट यांनी क्रिशावर मोफत शस्त्रक्रिया करून एक आदर्श निर्माण केला.

अकोला : घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची... मजुरीला गेल्याशिवाय घरातील चूल पेटत नाही... अशा परिस्थितीत क्रिशा चक्रनारायण या दोन वर्षाच्या चिमुकलीच्या किडनीवर कॅन्सरची गाठ आली. शस्त्रक्रिया करण्यासाठी दीड लाख रुपयांची गरज होती; परंतु एवढी रक्कम आणणार कोठून, असा प्रश्न क्रिशाच्या वडिलांना पडला. ‘लोकमत’ने ‘मदतीचा हात’ उपक्रमांतर्गत चिमुकल्या क्रिशाच्या वेदना समाजासमोर मांडल्या आणि शेकडो हात मदतीसाठी धावून आले. बाल शस्त्रक्रिया विशेषतज्ज्ञ डॉ. पराग टापरे, मुत्रविकार तज्ज्ञ डॉ. प्रशांत मुळावकर, भूलतज्ज्ञ डॉ. दीपक भट यांनी क्रिशावर मोफत शस्त्रक्रिया करून एक आदर्श निर्माण केला.श्रीमंती मोजायची असेल, तर नोटा मोजू नका... कधी चुकून डोळ्यांत दोन अश्रू आले, तर ते पुसायला किती जण येतात, हे मोजले पाहिजे. अशीच काहीशी प्रचिती क्रिशाच्या आजारीपणात पाहायला मिळाली. किडनीच्या कॅन्सरशी लढणाºया चिमुकल्या क्रिशा चक्रनारायण हिला दानशूरांनी मदत करून माणुसकीचा परिचय दिला. यावलखेड येथील क्रिशा हिच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची. वडील मजुरी काम करतात. अशातच क्रिशाला किडनीवर कॅन्सरची गाठ असल्याचे निदान झाले. ही गाठ काढावी लागेल; अन्यथा कॅन्सर पूर्ण शरीरात पसरेल. त्यासाठी दीड लाख रुपये खर्च येईल, असे डॉक्टरांनी सांगितले होते. आता पैसे कोठून आणावे, असा प्रश्न वडिलांना पडला. ‘लोकमत’ने मदतीचा हात उपक्रमांतर्गत चिमुकल्या क्रिशाच्या वेदना समाजासमोर मांडल्या आणि पाहता पाहता शेकडो हात क्रिशाच्या मदतीसाठी पुढे आले. दोन दिवसांपूर्वी मुत्रविकार तज्ज्ञ डॉ. प्रशांत मुळावकर, डॉ. पराग टापरे यांनी पुढाकार घेऊन क्रिशावर यशस्वी शस्त्रक्रिया करून तिच्या किडनीवरील कॅन्सरची गाठ काढली. सहृदयी समाजाची आर्थिक मदत आणि सुनील वाठोरे, आरोग्यसेवक मनोज बोबडे, मदन तायडे, नरेंद्र गावंडे, दीपक पांडव यांच्या प्रयत्नांमुळे चिमुकलीला जीवनदान मिळाले. आता क्रिशाची प्रकृती ठणठणीत असून, तिच्याच नव्हे, तर कुटुंबीयांच्यासुद्धा चेहºयावर आनंद ओसंडून वाहत आहे.आ. शर्मा, माजी आ. भदे यांच्याकडूनही आर्थिक मदतआमदार गोवर्धन शर्मा व रामनवमी शोभायात्रा समितीने क्रिशाच्या घरी जाऊन २१ हजार रुपयांची मदत तिच्या वडिलांच्या सुपूर्द केली. यासोबतच माजी आमदार हरिदास भदे यांनी तीन हजार रुपयांची मदत टापरे यांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तिच्या वडिलांच्या सुपूर्द केली. यावेळी त्यांच्यासोबतच जि.प. अध्यक्ष संध्या वाघोडे व भारिप-बमसंचे पदाधिकारी उपस्थित होते.यांनी केली आर्थिक मदतक्रिशाच्या शस्त्रक्रियेसाठी दादाराव गोगटे, राजेंद्र डिगांबर, देवयानी थोरात, मूर्तिजापूर येथील रामटेके, संत ज्ञानेश्वर विद्यालय, बी.एस. मोरडे, राम घाटोळ, रामराव वाहुरवाघ, विनीता म्हसाळकर, गोपाल बारड, संदीप शेंडगे, मगन ऊर्फ मंगेश वीसपुते, सुभाष लंगोटे यांच्यासह अनेकांनी आर्थिक मदतीचा हात दिला. या सहृदयी दानशुरांमुळे ६0 हजार रुपयांची रोख रक्कम जमा झाली. या आर्थिक मदतीतून क्रिशावर औैषधोपचार व महागड्या इंजेक्शनचा खर्च भागविला जाणार आहे.

 

टॅग्स :Akola cityअकोला शहरdoctorडॉक्टर