जिल्हास्तर सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेला गुरुवारपासून होणार प्रारंभ

By रवी दामोदर | Updated: July 14, 2024 17:53 IST2024-07-14T17:53:36+5:302024-07-14T17:53:53+5:30

स्पर्धा मनपा क्षेत्र व जिल्हा क्षेत्र या दोन विभागात होणार असल्याची माहिती आहे.

District level Subroto Mukherjee football tournament will start from Thursday | जिल्हास्तर सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेला गुरुवारपासून होणार प्रारंभ

जिल्हास्तर सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेला गुरुवारपासून होणार प्रारंभ

रवी दामोदर, अकोला

अकोला : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा परीषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत गुरुवार, दि.१८ जूलैपासून जिल्हास्तर सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा मनपा क्षेत्र व जिल्हा क्षेत्र या दोन विभागात होणार असल्याची माहिती आहे.

दि.१८ जूलैपासून स्पर्धेला सुरुवात होणार असून, २२ जूलैपर्यंत स्पर्धा शहरातील शास्त्री स्टेडिअमवर रंगणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी क्रीडा कार्यालयाच्या संकेतस्थळावर दि.१७ जूलैपर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे. स्पर्धेत जास्तीत जास्त शाळांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट यांनी केले आहे.
 
नोंदणीकृत संघांनाच होता येणार सहभागी
जिल्हास्तर सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीकृत संघांनाच स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. स्पर्धेकरीता १५ वर्षाखालील मुले (सबज्युनीअर) व १७ वर्षाखालील मुले व मुली (ज्युनीअर) खेळाडू असणे गरजेचे आहे. स्पर्धेतील सामने दि.१८, १९ व २२ जूलै या रोजी पार पडणार आहेत.
 

Web Title: District level Subroto Mukherjee football tournament will start from Thursday

टॅग्स :Akolaअकोला