शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

कोरेगाव भीमा घटनेचे जिल्हय़ात पडसाद : अकोला, अकोट, लोहार्‍यात बसची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 2:20 AM

अकोला : पुणे जिल्हय़ातील  कोरेगाव भीमा येथे सोमवारी दोन गटात झालेल्या संघर्षाच्या  घटनेचे तीव्र प्रतिसाद मंगळवारी अकोला जिल्हय़ातही उमटले. संतप्त युवकांनी अकोला शहरातून मोर्चा काढून शहरातील बाजारपेठा बंद करण्याचा प्रयत्न केला, तर अकोट व लोहारा येथे काही युवकांनी बसची तोडफोड केली. मंगळवारी संध्याकाळ पर्यंत आंदोलनकर्त्यांनी ठिकठिकाणी रोष व्यक्त केला. 

ठळक मुद्देअकोल्यात बाजारपेठ बंद

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पुणे जिल्हय़ातील  कोरेगाव भीमा येथे सोमवारी दोन गटात झालेल्या संघर्षाच्या  घटनेचे तीव्र प्रतिसाद मंगळवारी अकोला जिल्हय़ातही उमटले. संतप्त युवकांनी अकोला शहरातून मोर्चा काढून शहरातील बाजारपेठा बंद करण्याचा प्रयत्न केला, तर अकोट व लोहारा येथे काही युवकांनी बसची तोडफोड केली. मंगळवारी संध्याकाळ पर्यंत आंदोलनकर्त्यांनी ठिकठिकाणी रोष व्यक्त केला. कोरेगाव भीमा येथे सोमवारी दोन गटात झालेल्या वादावरून दगडफेक झाली होती. या घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण राज्यात उमटले. अकोला शहरात काही युवकांनी सातव चौक, जठारपेठ, राऊतवाडी, लहान उमरी, रतनलाल प्लॉट चौक, केडिया प्लॉट, नवीन कपडा बाजार परिसरातून मोर्चा काढला व बाजारपेठ बंद करण्याचा प्रयत्न केला. यावेळी युवकांनी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, जिल्हय़ातील संवेदनशील असलेल्या बाळापूर तालुक्यातील लोहारा येथे काही युवकांनी परिवहन महामंडळाच्या बसवर दगडफेक केली. यामध्ये चार प्रवासी जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच उरळ पोलिसांनी लोहारा येथे धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. अकोट येथे संतप्त युवकांनी अंजनगाव रोड नाक्याजवळ अकोला-परतवाडा बसवर दगडफेक करून बसच्या काचा फोडल्या. बसमधील प्रवासी सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, तेल्हारा तालुक्यातील दापुरा फाट्यावर ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. तेल्हार्‍यात युवकांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून निवेदन सादर केले. बाळापूर येथेही पोलीस ठाण्यात निवेदन सादर करण्यात आले. जिल्हय़ातील तेल्हारा व बाळापूर येथील आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत, तर अकोट फैलमध्ये आंदोलनकर्त्यांनी एसटी बसवर दगडफेक करीत तोडफोड करण्याचा प्रयत्न केला; मात्र वेळीच पोलिसांनी कारवाईचा इशारा दिल्याने हे प्रकरण शांत झाले. त्यानंतर खदानवर दगडफेक करण्यात आली, तर अकोट शहर आणि अकोट ग्रामीणमध्येही यावेळी आंदोलन करण्यात आले असून, एसटी बसवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली. 

बुधवारी एसटी, सर्व शाळा बंद  कोरेगाव भीमा येथील घटनेचे राज्यासह अकोल्यात तीव्र पडसाद उमटले. आंबेडकरी चळवळीतील विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी बुधवारी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे. या पृष्ठभूमीवर अकोला जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी मंगळवारी रात्री १२ ते बुधवारी रात्री १२ पर्यंत एसटी महामंडळाची प्रवासी वाहतूक तसेच जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालय बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांनी बुधवारी प्रवास टाळावा तसेच अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

भीमसैनिकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक!कोरेगाव भीमा येथील घटनेचे अकोल्यात तीव्र पडसाद उमटले. आंबेडकरी चळवळीतील विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. मोर्चा काढून तसेच निदर्शने करून घटनेचा निषेध नोंदविण्यात आला व जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. कोरेगाव भीमा  येथील घटनेचा निषेध करीत, दोषींना अटक करण्याच्या मागणीसाठी शहरातील तरुण भीमसैनिकांच्यावतीने अशोक वाटिका येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत घटनेचा निषेध करण्यात आला. तसेच मागण्यांचे निवेदन अपर जिल्हाधिकारी नरेंद्र टापरे यांना देण्यात आले. मोर्चात बाळासाहेब इंगोले, नीतेश किर्तक, आकाश इंगळे, राजेंद्र पातोडे, जीवन डिगे, सिद्धार्थ वरोठे, महादेव शिरसाट, आकाश शिरसाट, संदीप तायडे, संजय इंगळे, मनोज इंगळे, अँड. आशिष सावळे, सागर खाडे, सतीश जंजाळ, अमित खांडेकर, नितीन सपकाळ, राजकुमार दामोदर, आनंद खंडारे, मोहन बडगे, धम्मा दंदी, प्रेम वानखडे, संतोष उमाळे यांच्यासह इतर भीमसैनिक सहभागी झाले होते.

‘भारिप-बमसं’ने केला निषेध   कोरेगाव भीमा येथील घटनेचा तीव्र निषेध करीत, हल्लेखोरांना तातडीने अटक करून कडक कारवाई करण्याची मागणी भारिप बहुजन महासंघ जिल्हा शाखेच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. मागणीचे निवेदन अपर जिल्हाधिकारी नरेंद्र टापरे यांना देण्यात आले. यावेळी भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष आमदार बळीराम सिरस्कार, जिल्हा कार्याध्यक्ष काशीराम साबळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रतिभा अवचार, माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे, राजुमिया देशमुख, रवींद्र दारोकार गुरुजी, शरद गवई, गजानन गवई, दीपक सावंग, डॉ. प्रसन्नजित गवई, दिलीप मोहोड, बालमुकुंद भिरड, शंकरराव इंगळे, पराग गवई, प्रा. मंतोष मोहोळ, देवका पातोंड, सम्राट सुरवाडे, ज्ञानेश्‍वर सुलताने, अशोक सिरसाट, बळीराम चिकटे, सिद्धार्थ सिरसाट, राहुल अहिरे, श्रीकांत ढगेकर, रवी पाटील, प्रतिभा नागदेवते, अनुराधा ठाकरे (दोड), शेख साबीर, शेषराव वानखडे, मिलिंद आकोडे, मंजू भटकर, आकाश वाहुरवाघ, सचिन डोंगरे, आकाश खंडारे, सागर शिरसाट, दीपक गजभिये, धीरज आठवले यांच्यासह भारिप-बमसंचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

एसटी बसवर दगडफेकअकोला शहरातील अकोट फैल, खदान, अकोट शहर व ग्रामीण, लोहारा, रिधोरा या ठिकाणी एसटी बसवर दगडफेक करण्यात आली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी मोठय़ा प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. अकोट फैलमध्ये मोठा जमाव जमताच पोलिसांनी त्यांना कारवाईचा इशारा देताच हा जमान निघून गेला. या पाच ते सहा ठिकाणांसह शहरात अनेक ठिकाणी किरकोळ दगडफेक झाली.

पोलीस बंदोबस्तात पाच बस रवानाअकोला आगार क्रमांक दोनमधून सायंकाळपर्यंत यवतमाळ, कारंजा, मूर्तिजापूर मार्गे पाच बस पोलीस बंदोबस्तात पाठविण्यात आल्यात. दरम्यान, अकोट मार्ग, अकोट फैल आणि खदान परिसरात तीन बसच्या काचा जमावाने फोडल्या. त्यानंतर मात्र सर्व बस आहे तेथेच थांबविण्याचे आदेश वरिष्ठांकडून मिळाले. त्यामुळे अकोला बसस्थानकावर काही प्रवासी अडकून पडले आहेत, अशी माहिती अकोला आगार क्रमांक दोनचे आगार व्यवस्थापक अरविंद पिसोळे यांनी दिली.दुपारी १२ पर्यंत   पेट्रोल पंप बंद! बुधवारी दुपारी १२ वाजेपर्यंत अकोला जिल्हय़ातील पेट्रोल पंप आणि डीझल पंप बंद राहणार आहेत. अधिकारी, संघटना आणि राजकीय पुढार्‍यांच्या एकत्रित बैठकीत हा निर्णय अकोला जिल्हा पेट्रोल पंप असोसिएशनचे अध्यक्ष राहुल राठी यांनी घेतला आहे. या निर्णयाबाबत त्यांनी सर्वांना दुपारी १२ पर्यंंत पेट्रोल पंप बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.

दुकाने बंद पाडली!शहरातील मुख्य बाजारपेठ गांधी चौक, श्रीराम द्वार, श्रीकृष्ण द्वारसह जठारपेठ, खदान, सिव्हिल लाइन, रणपिसे नगर, जुने शहर, डाबकी रोड, वाशिम बायपास, गुडधी, अकोट फैल या परिसरातील दुकाने बंद करण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी आवाहन केले. या प्रकरणात जठारपेठ व कृषी नगरातील काही आंदोलनकर्त्यांंवर सिव्हिल लाइन पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

जिल्हय़ात १0 ठिकाणांवर हल्लाबोलजिल्हय़ातील तेल्हारा, बाळापूर, रिधोरा, लोहारा, दहीहांडा, शिवणी टी-पॉइंट, खदान, अकोट शहर, अकोट फैल, कृषी नगर, जठारपेठ या परिसरात आंदोलन करण्यात आले. या ठिकाणांवर हल्लाबोल करीत नारेबाजी करण्यात आली. पोलिसांनी बाळापूर व तेल्हारा येथील आंदोलनकर्त्यांंवर गुन्हे दाखल केले असून, जठारपेठ व सिव्हिल लाइन येथील आंदोलनकर्त्यांंवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

रिपाइं युवक आघाडीने केली निदर्शने!कोरेगाव भीमा येथील घटनेचा निषेध करीत भीमसैनिकांवरील हल्लय़ाची ‘सीबीआय’मार्फत चौकशी करून हल्लेखोरांना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाइं) आठवले गट युवक आघाडी जिल्हा शाखेच्यावतीने मंगळवारी  निदर्शने करण्यात आली, तसेच मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. यावेळी रिपाइं युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बुद्धभूषण गोपनारायण, मंगेश शेगोकार, विवेक किर्तक, विनोद खंडारे, उमेश सिरसाट, सत्यजीत सिरसाट, अजय गवई, अजय सिरसाट, शिवम किर्तक, अमोल भोजने, सुरेश हनवते, आकाश हिवराळे, विनोद गोपनारायण, मनोज इंगळे, रोहित वानखडे, अभिषेक सोनटक्के  व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

घुसरमध्ये पोलिसांच्या वाहनावर दगडफेकपोलीस गस्तीवर असलेल्या अकोट फैल पोलिसांच्या वाहनावर घुसर येथील अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक केली. या दगडफेकीत एक पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती असून, त्यांना तातडीने सवरेपचार रुग्णालयात पाठविण्यात आले. पोलिसांच्या वाहनावर मंगळवारी रात्री उशिरा हल्ला चढविल्यानंतर हल्ला करणारे फरार झाले. या घटनेची माहिती मिळताच अकोट फैलचे ठाणेदार संजीव राउत पोलीस  कर्मचार्‍यांसह घुसर येथे दाखल झाले असून वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनीही रात्री उशिरा घुसर येथे धाव घेतल्याची माहिती आहे.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावAkola cityअकोला शहरAkola Ruralअकोला ग्रामीण