जिल्हा परिषद सदस्य विजय लव्हाळे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 15:05 IST2018-12-04T15:05:21+5:302018-12-04T15:05:56+5:30
अकोला : जिल्हा परिषदेच्या व्याळा सर्कलचे सदस्य तथा भारिप-बहुजन महासंघाचे नेते विजय लव्हाळे यांचे मंगळवारी दीर्घ आजाराने निधन झाले.

जिल्हा परिषद सदस्य विजय लव्हाळे यांचे निधन
अकोला : जिल्हा परिषदेच्या व्याळा सर्कलचे सदस्य तथा भारिप-बहुजन महासंघाचे नेते विजय लव्हाळे यांचे मंगळवारी दीर्घ आजाराने निधन झाले. ते गत दोन वर्षांपासून कर्करोगाने ग्रस्त होते. मंगळवारी सकाळी अखेर त्यांची कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली. मंगळवारी पहाटे चार वाजता येथील तुकाराम हॉस्पिटलमध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. मुळचे बाळापूर तालुक्यातील खंडाळा येथील रहिवासी असलेल्या विजय लव्हाळे यांची जिल्हा परिषदेची ही दुसरी टर्म होती. अत्यंत मनमिळाऊ असलेले विजय लव्हाळे यांची जिल्हा परिषद व त्यांच्या मतदारसंघात ‘मामा’ म्हणून ओळख होती. मंगळवारी दुपारी खंडाळा या त्यांच्या गावात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जिल्हाभरातून मान्यवरांची उपस्थिती होती.