थंडीमध्ये गोरगरिबांना उबदार कपड्यांचे वितरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2017 08:07 IST2017-12-08T08:07:29+5:302017-12-08T08:07:47+5:30
संत गाडगे महाराज गोरक्षण संस्था, संत गाडगे बाबा स्वच्छता अभियानचा उपक्रम

थंडीमध्ये गोरगरिबांना उबदार कपड्यांचे वितरण
मूतिजापूर (अकोला) - शहरासह तालुक्यात सध्या थंडीचा जोर वाढला आहे. या थंडीत कुडकुडत असलेल्या गोरगरिबांना ग्रामीण भागात जाऊन वितरण करण्यात आले. तालुक्यातील कानडी, चिंचखेड, शेदगाव आदी गावांमध्ये जाऊन गरजुंना उबदार कपडे देण्यात आले.
मुंबईचे दानशूर व्यक्ती वाडीलाल यू. दोशी यांच्या सहकार्याने संपूर्ण गावात गोरगरिबांना थंडीच्या दिवसात स्वेटर उपलब्ध करून देण्यात आले. संत गाडगे महाराज गोरक्षण संस्था मूर्तिजापूर तथा संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान मूर्तिजापूर यांच्या सयुक्त विद्यामाने ग्रामीण भागात ज्येष्ठ नागरिक, महिलांना तथा चिमुकल्यांना थंडीपासून संरक्षण करण्यासाठी त्यांना स्वेटर, जर्किनचे वाटप करण्यात आले.
संत गाडगे महाराज गोरक्षण संस्थानचे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख, संत गाडगे बाबा चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईचे विश्वस्त प्रशांत देशमुख यांच्या मार्गदर्शनात विविध ठिकाणी जाऊन स्वेटरचे वितरण करण्यात आले. दारू पिऊ नका, खोटे काम करू नका, सर्वांनी व्यसनमुक्त राहुन सुखी जीवन जगून गाडगे बाबांनी दाखविलेल्या मार्गावर जीवनातील कार्य करावे, तसेच आपला परिसर स्वच्छ ठेवून स्वच्छतेची चळवळ निर्माण करावी, असे आवाहन संत गाडगे महाराज गोरक्षणचे सेवक सागर देशमुख यांनी यावेळी केले.
याप्रसंगी संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाचे प्रमुख सतीश अग्रवाल, सुरेश देशमुख, विनोद देवके, मुख्याध्यापक डिगांबर भुगूल, अनवर खान, विक्रम टाले, प्रमोद ठाकरे, संजय खांडेकर, पप्पू अग्रवाल, माजी पं.स. सदस्य रंजनी पवार, डॉ. बाबासाहेब कावरे, लखन पवार, सरपंच दुर्योधन राठोड, तंटामुक्ती अध्यक्ष दादाराव रामटेक, दामोदर सोनटक्के, माजी सरपंच पंजाबराव गावंडे, बाळू जाधव, यशवंत भगत, शालीग्राम पोळकट, प्रमोद ठोकळ, संतोष ठाकरे, रवी खांडेकर, विशाल वानखडे, अजय वाघपंचर, गजानन तायडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालक पत्रकार अनवर खान, प्रास्ताविक विनोद देवके तर आभार दिगंबर भुगूल यांनी मानले.