शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

आॅफलाइन धान्य वाटपाचा १६ जिल्ह्यात धडाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 3:11 PM

राज्यात एप्रिल ते डिसेंबर २०१८ या काळात ५८ लाख क्विंटल धान्याचे आॅफलाइन वाटप झाले.

- सदानंद सिरसाट  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून लाभार्थींना धान्य वाटप आॅनलाइन करण्याच्या पद्धतीला राज्यातील पुरवठा यंत्रणेने खो दिला आहे. विशेष म्हणजे, मार्चपर्यंत आॅफलाइन वाटप झालेल्या ५८ लाख क्विंटल धान्याच्या हिशेब मागवत, हा प्रकार तातडीने बंद करण्याचा आदेश केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा विभागाने मार्च २०१९ मध्ये दिला. त्या आदेशालाही धाब्याला बसवत १६ जिल्ह्यांमध्ये आॅफलाइन वाटपाचा धडाका सुरू असल्याचे आॅगस्ट महिन्यातील वाटपातून पुढे आले आहे.आधार लिंक शिधापत्रिकेतील लाभार्थींची ओळख आॅनलाइन पटवून धान्य वाटपाची आॅनलाइन ‘एई-पीडीएस’प्रणाली शासनाने तयार केली. मे २०१८ पासून सर्वच जिल्ह्यांत आॅनलाइन धान्य वाटप सुरू झाले. त्यानंतरही राज्यात एप्रिल ते डिसेंबर २०१८ या काळात ५८ लाख क्विंटल धान्याचे आॅफलाइन वाटप झाले. त्यावेळी राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये हा प्रकार सातत्याने घडला. त्याबाबत ५ मार्च २०१९ च्या अहवालानुसार केंद्रीय ग्राहक संरक्षण, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे संचालक डी. के. गुप्ता यांनी महाराष्ट्राच्याअन्न व नागरी पुरवठा प्रधान सचिवांना पडताळणी करून कारणे स्पष्ट करण्याचा आदेश १४ मार्च रोजी दिला होता. त्यानंतरही राज्यात आॅफलाइन धान्य वाटपाचा धडाका असल्याचे आॅगस्ट २०१९ च्या अहवालातून पुढे आले. १६ जिल्ह्यांत ही परिस्थिती गंभीर आहे. आधार लिंक कार्डधारकांना पॉस मशीनद्वारे आॅनलाइन धान्य वाटपाचे प्रमाण ४० ते ६७ टक्केच आहे. उर्वरित धान्याचे वाटप कोणाला होते, ही बाब धान्याचा काळाबाजार किती प्रमाणात होत आहे, हे अधोरेखित करणारी आहे. त्यामुळेच पुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी सर्वच पुरवठा उपायुक्तांना कारवाईचा इशारा दिला आहे.

आॅफलाइनचा मलिदा लाटणारे जिल्हेसिंधुदुर्ग-६२ टक्के, ठाणे-६१, रायगड-४६,नंदुरबार-५५, अहमदनगर-५८, जळगाव-५३, धुळे-६०, नाशिक-४९, पुणे-४५, सोलापूर शहर-४९, हिंगोली-५१, परभणी-४४, अमरावती-५९, बुलडाणा-६७, यवतमाळ-५९, गडचिरोली-५१ टक्के धान्य आॅनलाइन तर उर्वरित आॅफलाइन दिले जाते.

असा होतो काळाबाजारआधार लिंक होऊनही पॉस मशीनद्वारे पडताळणी अशक्य असलेल्यांना पुरवठा विभागाने नेमून दिलेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत धान्य वाटपाची सूट देण्यात आली. या संधीचा फायदा धान्याचा काळाबाजार करण्यासाठीच अधिक झाला. सरासरी १० ते २५ टक्के धान्य घेण्यासाठी लाभार्थी येतच नाहीत. प्रत्यक्ष लाभार्थी गायब असतानाही ‘नॉमिनी’च्या नावे आॅफलाइन धान्याची उचल करून त्याचा काळाबाजार केला जातो.

टॅग्स :Akolaअकोला