दुधाळ जनावरांचे वाटप अडकले आचारसंहितेत !
By Admin | Updated: September 19, 2014 02:06 IST2014-09-19T02:06:13+5:302014-09-19T02:06:13+5:30
सहा टक्के जनावरे वाटपाचे उद्दिष्ट होते; मात्र आचारसंहिता लागल्याने वाटपाचा कार्यक्रम लांबला. आहे.
दुधाळ जनावरांचे वाटप अडकले आचारसंहितेत !
अकोला : राज्यातील शेतकर्यांना दुधाळ जनावरे वाटप करण्याची योजना शासनाने सुरू केली. या योजनेंतर्गत यावर्षी सहा टक्के जनावरे वाटपाचे उद्दिष्ट होते; मात्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने जनावरे वाटपाचा कार्यक्रम लांबला आहे.
शेतकरी आत्महत्या सत्रानंतर विदर्भातील सहा जिल्ह्यात दुधाळ जनावरे वाटपापासून ते कालवड,चारा वाटप ,गावनिहाय पशूतंत्रज्ञ योजना आदी उपाययोजना राबविण्यात आल्या. यातील काही योजना र खडल्या तर काही योजनांची अंमलबजावणी झाली आहे. यावर्षी सहा टक्के दुधाळ जनावरे वाटपाचं उदिष्ट होते. त्यासाठी पशूसंवर्धन विभागास अमरावती विभागातील प्रत्येक जिल्ह्यातून, तसेच प्रत्येक तालुक्यातून अर्ज प्राप्त झाले आहेत. पंरतु प्रत्येक जिल्हयातून ५0 ते ६0 लाभार्थ्यांचीच निवड या योजनेसाठी केली जाणार आहे. त्यामुळे गरजू लोकांना जनावरांचे वाटप व्हावे, अशी शेतकर्यांची अपेक्षा आहे. अशातच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे दुधाळ जनावरे वाट पाचा हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.
दरम्यान, अलिकडे देशी जनावरांच्या संख्येत घट झाली असून, दुधाचे उत्पादन घटले आहे. यावर मा त करण्यासाठी राज्यातील गायी, म्हशींची उत्पादकता वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. गतवर्षी गायी, म्हशी अनुवांशिक सुधारणा कार्यक्रम राबविण्यासाठी योजना राबिवण्यात आली. यामध्ये प्र त्येक गावातील दज्रेदार देशी गायी, म्हशींची निवड करू न चांगल्या दर्जाचे कृत्रिम रेतन करणे मह त्वाचे होते. यासाठी राज्यातील १४ प्रजातींच्या विविध गायी आणि म्हशींच्या अनुवांशिक विकासासाठी या व्यवस्थापनाचा आधार घेण्यात येत आहे. यासाठी गायींची निवडही झाली असली तरी, पुढील प्रक्रीयेला विलंब होत असल्याचे चित्र दिसत आहे.
पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ.अशोक हजारे यांनी यंदा सहा टक्के दुधाळ जनावरे वाटपाचं उद्दिष्ट असून आचारसंहिता संपताच अर्जाची छानणी करू न जनावरांचे वाटप करण्यात येईल, असे त्यांनी सांगीतले.