४00 विद्यार्थ्यांना २ लाखाचे साहित्य वाटप

By Admin | Updated: August 4, 2014 00:30 IST2014-08-04T00:30:47+5:302014-08-04T00:30:47+5:30

अंतरीक्ष पार्श्‍वनाथ संस्थानचा पूढाकार : ब्लँकेट व शालेय साहित्याचा समावेश

Distribution of 2 lakhs of literature to 400 students | ४00 विद्यार्थ्यांना २ लाखाचे साहित्य वाटप

४00 विद्यार्थ्यांना २ लाखाचे साहित्य वाटप

वाशिम : येथील पंचशिलनगर येथील संत महर्षि गाडगेबाबा प्राथमिक शाळेच्या ४00 विद्यार्थ्यांना अंतरिक्ष पार्श्‍वनाथ महाराज संस्थान शिरपूरच्या वतीने उच्च प्रतिचे सुमारे दोन लाख रुपये किमतीचे ब्लँकेट व शालेयपयोगी साहित्याचे अंतरिक्ष पार्श्‍वनाथ महाराज संस्थानचे अध्यक्ष मनुबाई कोरडीया यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी मॅनेजिंग ट्रस्टी दिलीपभाई शाह यांची प्रमुख उपस्थिती होती. शिरपूर जैन येथे अंतरिक्ष पार्श्‍वनाथ संस्थानमध्ये श्‍वेतांबर जैन मुनीश्री विमलहंस विजयजी महाराज व मुनीश्री परमहंस विजयजी महाराज यांनी वाशिम येथील पंचशिल नगरच्या झोपडपट्ीत संस्थाध्यक्ष राजू धोंगडे यांच्या संत गाडगेबाबा प्राथमिक शाळेतील अत्यंत गरीब असलेल्या चारचे विद्यार्थ्यांसाठी सदर ब्लँकेट व शालेय साहित्य उपलब्ध करुन दिले होते. मुनीश्री विमलहंस विजयजी महाराज यांच्या प्रेरणेने मिळालेल्या ब्लँकेट व शालेय साहित्य वाटप कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षस्थानी अंतरिक्ष पार्श्‍वनाथ संस्थेचे अध्यक्ष मनुभाई कोरडीया यांची तर प्रमुख अतिथी म्हणून मॅनेजिंग ट्रस्टी दिलीपभाई शाह, जि.प. सभापती चक्रधर गोटे, अंतरिक्ष पार्श्‍वनाथ संस्थेचे विश्‍वस्त मनिष संचेती व राजेश मालीया, व्यसनमुक्तीचे प्रणेता डॉ. राजीव अग्रवाल, गाडगेबाबा शिक्षण संस्थेचे वरिष्ठ सल्लागार मंगल इंगोले, कान्स फार्मासिटीकल औरंगाबादचे संचालक सुरज चौधरी, बबन पाटील गारडे, प्रकाश पाटील, चतरकर मामा, विनोद आंबेकर, कार्तिक कोरडे, काशिराम राउत आदी मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते संत गाडगेबाबा साहित्य सम्राट अण्णाभाउ साठे, क्रांतिसूर्य महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतिमेचे पुजन व माल्यार्पण करण्यात आले. गाडगेबाबा प्राथमिक शाळेचे संस्थाध्यक्ष राजूभाउ धोंगडे यांनी सर्व मान्यवरांचे शाल व पुष्प देवून स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते संस्थेच्यावतीने विद्यार्थ्यांना शालेय गणवेश तसेच शिष्यवृत्तीच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमात लोकशाहीर उत्तमराव उर्फ धम्मानंद लोकशाहीर प्रज्ञानंद व लोकशाहीर मधुकर उर्फ कविनंद गायकवाड यांनी आपली कला सादर करुन विद्यार्थ्यांना मनोरंजनासह व्यसनमुक्तीचा संदेश दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक नंदकिशोर वाघ यांच्या नेतृत्वात शिक्षक संतोष जोगंदड, रवि चौधरी, सुनिल भुसळे, साखरे, प्रशांत तोष्णीवाल, शिक्षिका सुहासिनी इंगोले, विद्या ढोबळे, कांबळे यांनी परिश्रम केले. प्रास्ताविक मंगल इंगोले यांनी तर आभार प्रदर्शन व संचालन शिखरचंद बागरेचा यांनी केले.

Web Title: Distribution of 2 lakhs of literature to 400 students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.