वाशिम बायपास परिसरात दोन गटात वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:17 IST2021-02-05T06:17:52+5:302021-02-05T06:17:52+5:30
वाशिम बायपास परिसरात आंध्रा ट्रान्सपोर्ट आहे. या ट्रान्सपोर्ट वरून विविध शहरात जाणाऱ्या ट्रकला महाग भाडे देण्यात येतात. आंध्रा ट्रान्सपोर्ट ...

वाशिम बायपास परिसरात दोन गटात वाद
वाशिम बायपास परिसरात आंध्रा ट्रान्सपोर्ट आहे. या ट्रान्सपोर्ट वरून विविध शहरात जाणाऱ्या ट्रकला महाग भाडे देण्यात येतात. आंध्रा ट्रान्सपोर्ट संचालकांसोबत काही जणांचा वाद झाला. याच कारणावरून रविवारी रात्री काहीजणांनी आंध्रा ट्रान्सपोर्ट संचालकांसोबत वाद घालत त्यांना शिवीगाळ करीत मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आंध्रा ट्रान्सपोर्ट संचालकांचे काही युवक व त्यांना मारण्यासाठी आलेल्या युवकांमध्ये अश्लील शिवीगाळ तसेच मारहाणही झाली; मात्र पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतल्यामुळे हा वाद आपसात मिटवण्याचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू होते. याप्रकरणी रविवारी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली नव्हती. मात्र आंध्रा ट्रांसपोर्ट संचालक तक्रार करणार असल्याची माहिती आहे.