शिव परिवारातील प्राचार्यांची शिक्षणाधिकाऱ्यांसाेबत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:21 IST2021-09-22T04:21:51+5:302021-09-22T04:21:51+5:30

शिव परिवारातील प्राचार्य निंबा, विठ्ठल कुलट आसेगाव बाजार, प्रतिभा गावंडे शहर शाखा अकोला, संजय वालसिंगे अकोट, प्राचार्य अरूण हिंगणकर ...

Discussion of the principal of Shiv Parivar with the education officer | शिव परिवारातील प्राचार्यांची शिक्षणाधिकाऱ्यांसाेबत चर्चा

शिव परिवारातील प्राचार्यांची शिक्षणाधिकाऱ्यांसाेबत चर्चा

शिव परिवारातील प्राचार्य निंबा, विठ्ठल कुलट आसेगाव बाजार, प्रतिभा गावंडे शहर शाखा अकोला, संजय वालसिंगे अकोट, प्राचार्य अरूण हिंगणकर कुटासा, मनोज देशमुख राजंदा, दिलीप काकोडे कानशिवणी, रोहिदास मानकर गोरेगाव आदींचे शिक्षणाधिकरी सुचिता पाटेकर, लेखाधिकारी किशोर पुंडकर यांचे स्वागत केले. यावेळी शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर यांनी, भाऊसाहेब देशमुख यांचे पापळ हे गाव माझं सासर आहे. त्यामुळे शिवाजी शिक्षण संस्थेशी जुना ॠणानुबंध आहे. कुटासा येथील प्राचार्य अरुण हिंगणकर यांनी डाॅ. पंजाबराव उपाख्य देशमुख स्पंदन ग्रंथ भेट दिला. कविवर्य विठ्ठल कुलट यांनी काव्यगायन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. प्राचार्य विजय ठोकळ यांनी प्रास्ताविकातून सर्वांचा परिचय करून दिला. आभार प्राचार्य संजय वालसिंगे यांनी मानले.

फोटो:

Web Title: Discussion of the principal of Shiv Parivar with the education officer