साहित्याअभावी आपत्ती व्यवस्थापनावर ‘आपत्ती’!
By Admin | Updated: August 1, 2014 02:23 IST2014-08-01T01:39:04+5:302014-08-01T02:23:12+5:30
अकोला जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत होण्यासाठी अत्याधुनिक साहित्याची गरज

साहित्याअभावी आपत्ती व्यवस्थापनावर ‘आपत्ती’!
अकोला : पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या निमित्ताने संपूर्ण राज्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा हा चर्चेचा विषय झाली आहे. या पृष्ठभूमीवर अकोला जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत होण्यासाठी, या यंत्रणेस अत्याधुनिक साहित्याची गरज असल्याचे वास्तव ह्यलोकमतह्ण चमूने गुरुवारी केलेल्या पाहणीतून उजेडात आले.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण गाव गाडले गेल्याची माहिती बुधवारी सकाळी ७.३0 वाजताच्या सुमारास कळल्यानंतर, आपत्ती व्यवस्थापनाची चमू १0.३0 वाजताच्या सुमारास गावात दाखल झाली. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आवश्यक साहित्यासह घटनास्थळावर तातडीने पोहोचणे गरजेचे असते, यावर या घटनेच्यानिमित्ताने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. नैसर्गिक आपत्ती कधीही, कुठेही कोसळू शकते. आपत्ती व्यवस्थापन हे थेट लोकांच्या जीवन-मरणाशीच संबंधित आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण हे समाजातील प्रत्येक घटकातील व्यक्तींनी घेणे आता काळाची गरज बनली आहे. जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सक्षम राजकीय आणि प्रशासकीय ने तृत्वाची गरज आहे. प्रत्यक्षात मात्र काय स्थिती आहे, याची पाहणी ह्यलोकमतह्ण चमूने बुधवारी रात्री व गुरुवारी दिवसभर केली. यंत्रणेकडे आवश्यक साहित्य असले, तरी आपत्ती व्यवस्थापन प्रभावीपणे राबविण्यासाठी आणखी काही साहित्य गरजेचे असल्याचे यावेळी दिसून आले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे जिल्हा समन्वयक एस.पी. साबळे यांनी अकोला तहसील कार्यालय परिसरात फायबर बोट ठेवण्यात आली असल्याची माहीती दिली. ही बोट वजनाने जड असून, आवश्यकता भासल्यास बोट वा परण्यात येते. जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनासाठी या आवश्यक साहि त्याची मागणी शासनाकडे केली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला कायमस्वरुपी एक वाहन, १५0 लाईफ जॅकेट, १५0 लाईफ रिंग हे साहित्य आवश्यक आहे. यासाठी जून महिन्यातच शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याचे त्यांनी सांगीतले.
*काय आढळले..?
जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. लोकमत चमूने बुधवारी रात्री १२.३0 वाजता. नियंत्रण कक्षाला भेटी दिली. यावेळी एस.पी. शेटे व आर. एस. निलपगारे उपस्थित होते. गुरुवारी सकाळी ८. १0 वा. पुन्हा पाहणी केली असता चार कर्मचारी हजर होते.
*मनपाचा नैसर्गिक आपत्ती निवारण क क्ष वार्यावर !
अकोला : मनपा आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या आदेशानुसार अग्निशमन विभागात नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला. या कक्षासोब त समन्वय साधण्याची जबाबदारी मनपा अधिकार्यांना देऊन प्रत्यक्षात कारभार मात्र अग्निशमन विभागाकडे सोपविण्यात आला. सखल भागात पाणी साचल्यावर संबंधित क्षेत्रीय अधिकार्यांनी दखल घेण्याची गरज आहे. तसे होत नसल्याने नागरिक त्रस्त असून, हा विभाग नेमक्या कोणत्या कामासाठी आहे, असा प्रश्न उ पस्थित होत आहे.
पावसाळ्य़ात नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास नागरिकांच्या मदतीसाठी मनपा प्रशासनाच्यावतीने नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला. यामध्ये महापालिकेच्या आरोग्य, बांधकाम, नगर रचना, विद्युत विभाग, शिक्षण, जलप्रदाय व अतिक्रमण विभागाच्या प्रमुख अधिकार्यांनी नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्षासोबत समन्वय साधून नागरिकांना भेडसावणार्या समस्यांचे निराकरण करणे, त्यांना तातडीने मदत उपलब्ध करून देणे आदी बाबींचा समावेश आहे. यासंदर्भात आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी सर्व विभागप्रमुखांना निर्देश दिले. मध्यंतरी मुसळधार पावसामुळे शहराच्या सखल भागात घरांमध्ये पाणी शिरले. पाणी वाहून जाण्यासाठी मनपाने ठोस उपाययोजना न केल्याने अद्यापही काही भागात पाणी कायम आहे.