शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सात जागांवर काँग्रेसला विनाअट पाठींबा देण्यास ‘वंचित’ तयार - प्रकाश आंबेडकर  

By संतोष येलकर | Updated: March 19, 2024 19:16 IST

सात जागांवर काँग्रेसला विनाअट पाठींबा देण्यास वंचित बहुजन आघाडी तयार आहे.

अकोला: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसच्या वाट्याला येणाऱ्या जागांपैकी सात जागांवर काँग्रेसला विनाअट पाठींबा देण्यास वंचित बहुजन आघाडी तयार आहे. त्यासाठी संबंधित सात जागांची यादी काँग्रेसने ’वंचित’कडे पाठवावी, अशा प्रस्तावाचे पत्र काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पाठविले आहे, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी मंगळवारी येथे दिली.

राज्यात महाविकास आघाडीतील जागावाटपात १० जागांवर काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट आणि ५ जागांवर राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गट, काँग्रेस व शिवसेना ठाकरे गट यांच्यात रस्सीखेच सुरु आहे. महाविकास आघाडीतील संबंधित तीन घटक पक्षांचे जागावाटप निश्चित होत नसतानाच लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील जागावाटपात काँग्रेसच्या वाटयावर येणाऱ्या जागांपैकी सात जागांची यादी काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीकडे पाठवावी, संबंधित सात जागांवर वंचित बहुजन आघाडी विनाअट काॅंग्रेसला पाठींबा देण्यास तयार असल्याचा निर्णय ‘वंचित’ ने घेतला आहे.

पक्षाने मांडलेल्या या प्रस्तावाचे पत्र मंगळवारी दुपारीच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे यांना पाठविण्यात आल्याचे आंबेडकर म्हणाले. यासंदर्भात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट यांच्याबाबत कोणताही निर्णय घेतला नसून, जिंकणाऱ्या सात जागांची यादी काँग्रेसने ‘वंचित’ला द्यावी, त्या जागांवर पक्ष काँग्रेसला पाठींबा देणार आहे. त्यासाठी कोणतीही अट व शर्त ठेवण्यात आली नाही, असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डाॅ.धैयर्वधन पुंडकर, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, मिलींद इंगळे, बालमुकुंद भिरड, गजानन गवइ, विकास सदांशिव, पराग गवइ आदी उपस्थित होते.

महाविकास आघाडीत १५ जागांवर ताळमेळ नाही!महाविकास आघाडीतील काॅग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट या घटक पक्षांतील जागावाटपात १५ जागांवर अद्यापही ताळमेळ नाही, असे सांगत आम्ही कोणालाही सोडले नसून, काँग्रेसला सात जागांवर पाठींबा देण्याची भूमिका पक्षाने घेतल्याचेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

मविआने तीनदा ३ जागांचा दिलेला प्रस्ताव फेटाळला राज्यातील जागावाटपात महाविकास आघाडीने तीनदा तीन जागांचा दिलेला प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीने फेटाळला आहे, असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

युतीसाठी शेवटपर्यंत दरवाजे उघडेच महाविकास आघाडीत आमचा कोणी विश्वासघात केला नाही आणि आम्ही कोणाचा विश्वासघात केला नाही, असे सांगत महाविकास आघाडीसोबत युतीसाठी शेवटच्या क्षणापर्यंत आमचे दरवाजे उघडेच आहेत, असेही आंबेडकर यांनी सांगितले.

टॅग्स :AkolaअकोलाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीcongressकाँग्रेसPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर