वाळवंटातील घाण वारकरीबाह्य घटकांमुळे !

By Admin | Updated: February 28, 2015 00:47 IST2015-02-28T00:47:39+5:302015-02-28T00:47:39+5:30

लोकमत मुलाखत; तुकाराम महाराजांचे तेरावे वंशज देहूकर महाराजांची माहिती.

Dirt in the desert due to outbreaks of war! | वाळवंटातील घाण वारकरीबाह्य घटकांमुळे !

वाळवंटातील घाण वारकरीबाह्य घटकांमुळे !

ब्रम्हानंद जाधव/मेहकर (जि. बुलडाणा): पंढरपूरच्या वाळवंटात फड उभारून भजन-कीर्तन केल्याने कुठल्याही प्रकारची अस्वच्छता होत नाही; कारण वाळवंटातील घाण ही वारकर्‍यांमुळे होत नसून, ती वारकरीबाह्य घटकांमूळे होते, असे स्पष्ट प्रतिपादन तुकाराम महाराजांचे तेरावे वंशज व पंढरपूरचे फडकरी प्रा. बाळासाहेब महाराज देहूकर यांनी ह्यलोकमतह्णशी बोलतांना केले. मेहकर येथे २७ फेब्रुवारी रोजी एका कार्यक्रमानिमित्त ते आले होते. न्यायालयाने वाळवंटातील अस्वच्छतेबाबत थेट वारकर्‍यांनाच सवाल केल्याने पंढरीतील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पृष्ठभूमीवर देहूकर महाराज यांनी त्यांचे विचार मांडले.

प्रश्न : पंढरपूरच्या वाळवंटातील घाण कशामूळे होते?
-कार्तीकी यात्रेच्यावेळी वाळवंटात होणारी सर्व घाण ही केवळ वारकर्‍यांमूळेच होते, हा गैरसमज आहे. वास्तविक वाळवंटात होणारी ८0 टक्के घाण ही वारकरीबाह्य घटकांमुळे होते. जसे वाळवंटात लागणारी हॉटेल्स व दुकानांचे तंबू, फेरीवाले, फेरीवाल्यांनी तात्पुरत्या मुक्कामासाठी ठोकलेले तंबू, पार्कींगसाठी येणारी वाहने, मोकाट गुरेढोरे आदी घटकांमूळे वाळवंटात घाण पसरते.

प्रश्न : फडांमध्ये कचरा निर्माण होत नाही का?
-महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातील वारकरी वाळवंटातील फडांमध्ये हजेरी लावतात. त्यामुळे निश्‍चितच कचरा निर्माण होऊ शकतो. या फडांमधून होणार्‍या पंगतीच्या पत्रावळींचा व शिल्लक राहीलेल्या अन्नाचा कचरा ही बाब मान्य आहे. परंतु इतर घटकांपेक्षा फडांमध्ये केवळ २0 टक्के कचरा निर्माण होतो.

प्रश्न : पंढरीच्या वाळवंटातील अस्वच्छतेला आळा कसा बसेल?
-फडांमधून होणारा कचरा दूर करण्यासाठी प्रत्येक फडापुढे एक कचराकुंडी ठेऊन त्यातील कचरा दररोज गावाबाहेर हलविला गेल्यास अस्वच्छतेला आळा बसू शकतो. त्याचबरोबर वाळवंटात फिरती शौचालये तयार करून, गावांमध्ये चौकाचौकात शौचालये उभारून वारकर्‍यांच्या शौचविधीची सोय करता येऊ शकते.

प्रश्न : सध्याच्या फिरत्या शौचालयांची काय स्थिती आहे?
-कार्तीकी यात्रेला फिरती शौचालये असतात, परंतु त्यात पाण्याची उपलब्धता नसते. त्यातील घाणेची दररोज विल्हेवाट लावली जात नाही. त्यामुळे फिरत्या शौचालयातून दुर्गंधी सुटल्याने वारकरी या शौचालयात जाणे टाळतात. शेवटी याला प्रशासनच कारणीभूत आहे.

प्रश्न : वारकर्‍यांची बाजू समजून घेतली जाते का?
-वारकर्‍यांची बाजू समजून घेण्यामध्ये व ती न्यायालयापुढे मांडण्यामध्ये शासन कमी पडत आहे. चंद्रभागेच्या तिरावरील घाण व अस्वच्छतेच्या विळख्याला कारणीभूत ठरणार्‍या अनेक घटकांना दोषी धरण्याऐवजी त्याचे खापर केवळ वारकर्‍यांवर फोडले जाते. वारकर्‍यांच्या शतकानुशतकांच्या परंपरांना बाधा निर्माण करणे म्हणजे ह्यजखम पायाला व पट्टी कपाळालाह्ण असा प्रकार झाला आहे.

प्रश्न : फडाची परंपरा केंव्हापासून आहे?
-महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून पंढरपूर वारीची पंरपरा ही शेकडो वर्षे जुनी आहे. फडकर्‍यांची वाळवंटात फड उभारून कीर्तन-भजन करण्याची परंपरा ७५0 वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे वारकर्‍यांची बाजु समजून घेण्याची गरज आहे.

Web Title: Dirt in the desert due to outbreaks of war!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.