शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

जानेवारीत ठरणार एसटी कामगारांच्या आंदोलनाची दिशा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 2:07 PM

अकोला : महाराष्ट्र इंटक कामगार संघटनेने १० जानेवारीनंतर एसटी कामगार आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला आहे, त्यामुळे इतर संघटना संभ्रमात सापडल्या आहेत.

ठळक मुद्दे महाराष्ट्र इंटक कामगार संघटनेने उपसले शस्त्र : न्यायालयीन निर्वाळ्याकडे लक्ष

अकोला : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या हजारो कामगारांनी एकाच वेळी राज्यभरात चक्काजाम केल्याने ऐन दिवाळीत सर्वसामान्य प्रवाशांची कोंडी झाली होती. राज्य शासनाने सदर आंदोलन अनधिकृत ठरवून कामगारांनी विनापगारी केले. त्यानंतर कामगारांच्या वेतनासंदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले; मात्र अद्याप कारवाईची प्रक्रिया पुढे न सरकल्याने कामगारांचे लक्ष न्यायालयाकडे लागले आहे. दरम्यान, महाराष्ट्र इंटक कामगार संघटनेने १० जानेवारीनंतर एसटी कामगार आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला आहे, त्यामुळे इतर संघटना संभ्रमात सापडल्या आहेत.एसटी कामगारांचे चार दिवस चाललेले चक्काजाम आंदोलन उच्च न्यायालयाने अनधिकृत ठरविल्यानंतर उच्चस्तरीय समिती गठित केली. कामगारांच्या वेतन वाढीचा अहवाल १५ नोव्हेंबर १७ पर्यंत सादर करण्याचे सुचविले; मात्र हा अहवाल सादर झाला की नाही, याबाबत विविध प्रवाह कामगार संघटनेत आले. दरम्यान, उच्च न्यायालयाने याप्रकरणी २२ डिसेंबर अहवाल आणि १० जानेवारीपर्यंत निर्णय राखून ठेवला आहे. त्यामुळे एसटी कामगारांच्या संघटनांचे लक्ष न्यायालयाच्या निर्णयाकडे लागून आहे. दरम्यान, महाराष्ट्र कामगार इंटक संघटनेने १० जानेवारीच्या निर्णयाचीदेखील वाट न पाहता, आंदोलन छेडण्याचा इशारा जाहीर केला आहे; मात्र इतर संघटनांनी अजूनतरी कोणतीही भूमिका घेतलेली नाही. एसटी कामगारांच्या वेतन वाढीचा मुद्दा प्रथमच न्यायालयात गेल्याने त्यांना यंदा न्याय मिळण्याची दाट शक्यता आहे. यादरम्यान महाराष्ट्र शासनाचे धोरण काय ठरते, याकडेही सर्वांचे लक्ष लागून आहे. कामगारांच्या चार दिवसांच्या चक्काजाम आंदोलनामुळे राज्य शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडाला आहे. ही स्थिती पुन्हा उद्भवू नये, यासाठी खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे आगामी जानेवारीमध्ये एसटी कामगारांच्या आंदोलनाची दिशा ठरविली जाणार आहे.

 

टॅग्स :ST Strikeएसटी संपstate transportराज्य परीवहन महामंडळ