दिग्रस बु.-दिग्रस खु. रस्त्याचे काम निकृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:35 IST2020-12-12T04:35:48+5:302020-12-12T04:35:48+5:30

दिग्रस बु.- दिग्रस खु. रस्त्याचे काम सुरू असून, या रस्त्याच्या कामात निकृष्ट साहित्याचा वापर करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला ...

Digras Bu.-Digras Khu. Road work inferior | दिग्रस बु.-दिग्रस खु. रस्त्याचे काम निकृष्ट

दिग्रस बु.-दिग्रस खु. रस्त्याचे काम निकृष्ट

दिग्रस बु.- दिग्रस खु. रस्त्याचे काम सुरू असून, या रस्त्याच्या कामात निकृष्ट साहित्याचा वापर करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. हा मार्ग पातूरला जाण्यासाठी सोयीचा ठरत असल्याने या मार्गाने वाहनांची वर्दळ सुरूच राहते. या मार्गावर माती मश्रित मुरूम टाकण्यात येत आहे. परिसरातील तुलंगा खुर्द, तुलंगा बु., लावखेड, संगोळा, चतारी, सस्ती, सुकळी आदी गावातील वाहनचालक, विद्यार्थ्यांची या मार्गावरून ये-जा सुरूच राहते. रस्त्याचे काम निकृष्ट झाल्यास पुन्हा काही दिवसात रस्त्याची दुरवस्था होण्याची शक्यता ग्रामस्थांनी वर्तविली आहे. त्यामुळे रस्त्याच्या कामात चांगल्या दर्जाचे साहित्य वापरण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (फोटो)

------------------------------

रस्त्याचे काम करताना निकृष्ट साहित्याचा वापर होत आहे. याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करण्यात येईल.

-मनोज गवई, माजी उपसरपंच, दिग्रस बु.

--------------------------

या रस्त्याने वर्दळ मोठ्या प्रमाणात असल्याने या रस्त्याचे काम चांगले करावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल.

-जीवन उपर्वट, प्रहार सेवक पातूर तालुका

Web Title: Digras Bu.-Digras Khu. Road work inferior