म्हातोडी येथे महिलांनी काढली धोंडी
By Admin | Updated: July 12, 2017 19:53 IST2017-07-12T19:53:38+5:302017-07-12T19:53:38+5:30
म्हातोडी : म्हातोडी येथे वरूणराजाला प्रसन्न करण्यासाठी गावातील शेकडो महिलांनी पानराजाला डोक्यावर घेऊन चांगला पाऊस पडण्यासाठी ११ जुलैला दुपारी डफड्याच्या तालावर धोंडी मागितली.

म्हातोडी येथे महिलांनी काढली धोंडी
लोकमत न्यूज नेटवर्क
म्हातोडी : म्हातोडी येथे वरूणराजाला प्रसन्न करण्यासाठी गावातील शेकडो महिलांनी पानराजाला डोक्यावर घेऊन चांगला पाऊस पडण्यासाठी ११ जुलैला दुपारी डफड्याच्या तालावर धोंडी मागितली.
यामध्ये आशा भगत, शामला घुगरे, सरस्वती ढेंगे, नलिनी भगत, शकुंतला भगत, माला बोबडे, ठाकरे, मंगला ढेंगे, रेश्मा खेतखेडे, कमलाबाई देशमुख, मुक्ता बुटे, मंदाकिनी परांजळे, नलिनी घोडे, पद्मा ढेंगे, पद्मा भगत, सूर्यकांता कुटेमाटे, शांताबाई ठाकरे, कोकिळा डांगरे, उमा भगत, सीमा कोगदे, शांताबाई भगत, इंद्रावती रायबोले, बेबी विधोकार आदी महिलांनी सहभाग घेतला. त्यानंतर १२ जुलै रोजी भंडारा आयोजित केला होता.