अल्लू पहेलवानसह त्याची चार मुले तडीपार

By Admin | Updated: October 6, 2014 01:40 IST2014-10-06T01:40:38+5:302014-10-06T01:40:38+5:30

अकोल्यातील हरिहरपेठेतील एक टोळीही तडीपार.

Detective of his four children, including Allu Phelwan | अल्लू पहेलवानसह त्याची चार मुले तडीपार

अल्लू पहेलवानसह त्याची चार मुले तडीपार

अकोला : कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी अल्लू पहेलवान ऊर्फ अलियार खान मिया खान (६0) याच्यासह त्याचा भाऊ व चार मुलांना जिल्हय़ातून दोन वर्षांसाठी तडीपार केले. हरिहरपेठेतील गुंडांची टोळीसुद्धा तडीपार केली. दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेल्यांमध्ये नवाबपुर्‍यातील अलियार खान मिया खान, बुढन ऊर्फ नियामत खान (५५), आझाद खान अलियार खान (३२), फिरोज खान अलियार खान (३0), जावेद खान अलियार खान (३0), मिया खान अलियार खान (२९) आणि जुने शहर हरिहरपेठेत राहणारे करण अशोक शाहू (२२), चेतन अशोक शाहू (२५), रोशन सुधीर ताकवाले (२0), राहुल अरूण ठाकूर (२0), आनंद अशोक गायकवाड (२१ रा. भारती प्लॉट) यांचा समावेश आहे. पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी कलम ५५ महाराष्ट्र पोलिस कायद्यान्वये ११ गुन्हेगारांविरुद्ध तडी पारीची कारवाई केली. निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर येत्या काही दिवसांमध्ये २५ ते ३0 गुन्हेगारांविरुद्ध तडीपारीची कारवाई करण्यात येणार आहे. गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांच्या याद्या तयार करून त्यांच्यावरील तडीपारीचे प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे.

Web Title: Detective of his four children, including Allu Phelwan