मंगल कार्यालयाबाहेर अन्नाची नासाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:18 IST2021-02-05T06:18:49+5:302021-02-05T06:18:49+5:30
जीएमसीत विजेचा अपव्यय अकोला: सर्वोपचार रुग्णालयात अधिकारी त्यांच्या दलनात उपस्थित नसतानाही लाईट आणि पंखे दिवसभर सुरू राहत असल्याचे चित्र ...

मंगल कार्यालयाबाहेर अन्नाची नासाडी
जीएमसीत विजेचा अपव्यय
अकोला: सर्वोपचार रुग्णालयात अधिकारी त्यांच्या दलनात उपस्थित नसतानाही लाईट आणि पंखे दिवसभर सुरू राहत असल्याचे चित्र दिसून येते. या प्रकारामुळे विजेचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होताना दिसून येत आहे. वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन विजेचा होणारा अपव्यय टाळण्याची गरज आहे.
जयहिंद चौकात वाहतुकीची कोंडी
अकाेला: जुने शहरातील जयहिंद चौकात नेहमीच वर्दळ राहते. रस्त्याची रुंदी कमी आणि अतिक्रमणामुळे चौकात नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. अनेकदा ऑटोचालक मध्येच ओटो उभे करत असल्याने वाहतूक विस्कळीत होते. चौकातच पोलीच चौकी आहे, मात्र तरीदेखील ही समस्या कायम आहे.
मास्क नसेल, तरीही ऑटोमध्ये प्रवेश
अकोला: कोरोनाकाळात प्रवासी ऑटोरिक्षामध्ये नो मास्क, नो एन्ट्री ही मोहीम शहरात राबविण्यात आली होती. शासनस्तरावर या मोहिमेची दखलही घेतली होती. मात्र, कोरोना काळातील नियम शिथिल केल्यानंतर विनामास्क प्रवाशांनाही ऑटोत प्रवेश दिला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. या बेफिकरीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढताना दिसून येत आहे.
उन्हाळी फळांची आवक
अकोला: गत आठवडाभरात रात्री थंडी, तर दिवसा ऊन अशा तापमानाचा अनुभव अकोलेकरांना येत आहे. सध्या शहरातील तापमानात वाढ होत असताना बाजारपेठेत उन्हाळी फळांची आवक वाढली आहे. उन्हाळी फळांना नागरिकांचाही प्रतिसाद दिसून येत आहे.