ग्रामपंचायतींच्या तपासणीचा बोजवारा

By Admin | Updated: September 19, 2014 02:04 IST2014-09-19T02:04:46+5:302014-09-19T02:04:46+5:30

अकोला जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा कारभार सुधारणार कसा?

Deposition of Gram Panchayats | ग्रामपंचायतींच्या तपासणीचा बोजवारा

ग्रामपंचायतींच्या तपासणीचा बोजवारा

संतोष येलकर /अकोला
दरमहा पंचायत समितींच्या विस्तार अधिकार्‍यांकडून ग्रामपंचायतींची तपासणी केली जाते; मात्र गेल्या सहा महिन्यांपासून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची तपासणीच करण्यात आली नसल्याने, जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या तपासणीचा बोजवारा उडाल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा कारभार सुधारणार कसा, असा प्रश्नही निर्माण होत आहे.
शासनामार्फत राबविण्यात येणार्‍या वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी आणि ग्रामपंचायतींकडून विविध विकास कामे केली जातात. या पृष्ठभूमीवर ग्रामपंचायतींच्या कर वसुलीपोटी एकूण मागणी आणि त्या तुलनेत होणारी कर वसुली, विविध योजना आणि विकास कामांसाठी प्राप्त होणारा निधी आणि त्यामधून होणारा खर्च, योजनांची अंमलबजावणी व इतर प्रकारची कामे केली जातात.
अकोला जिल्ह्यात ५४२ ग्रामपंचायती असून, या सर्व ग्रामपंचायतींची दरमहा करावयाची तपासणी गेल्या एप्रिलपासून विस्तार अधिकार्‍यांकडून करण्यात आली नाही. त्यामुळे जिल्ह्यात ग्रामपंचायत त पासणीच्या कामाचा बोजवारा उडाल्याची बाब समोर आली आहे. तपासणीच करण्यात आली नसल्याने जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या कारभारातील त्रुटींचा शोध घेऊन दुरुस्ती सुचविण्याची प्रक्रिया ठप्प झाल्याच्या स्थितीत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा कारभार सुधारणार कसा, असा प्रश्नही निर्माण होत आहे.

Web Title: Deposition of Gram Panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.