विभागीय शालेय कुस्ती स्पर्धापूर्व सराव शिबिराला प्रारंभ
By Admin | Updated: September 18, 2014 23:48 IST2014-09-18T23:48:28+5:302014-09-18T23:48:28+5:30
अकोला तालुक्यातील ३२ शालेय विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

विभागीय शालेय कुस्ती स्पर्धापूर्व सराव शिबिराला प्रारंभ
अकोला: जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने नव्याने निर्मित अकोला तालुका कुस्ती केंद्र संत गाडगेबाब व्यायाम शाळा जुने शहर येथे वर्ष २0१४-१५ करिता अमरावती विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेत निवड झालेले खेळाडूंकरिता स्पर्धापूर्व सराव शिबिराचे आयोजन केले आहे. यामध्ये नवोदित कुस्ती खेळाडूदेखील सहभागी झाले आहेत. शिबिरात अकोला तालुक्यातील ३२ शालेय विद्यार्थी सहभागी झाले आहेत. शिबिराला जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात कार्यरत आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक लक्ष्मीशंकर यादव मार्गदर्शन करीत आहेत. शिबिराला अकोला जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष राजेंद्र गोतमारे यांचे विशेष सहकार्य लाभत आहे. सरावाकरिता क्रीडा कार्यालयाच्यावतीने आंतरराष्ट्रीय स्तराची मॅट उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे कुस्तीगिरांच्या क्रीडा कौशल्यामध्ये लक्षणीय वाढ दिसत आहे. शिबिराला जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी भेट देऊन प्रशिक्षणाची पाहणी केली. याप्रसंगी जुन्या पिढीतील मल्ल रमेश मोहोकार, माजी प्राचार्य मोरेश्वर मोर्शीकर, प्रशिक्षक लक्ष्मीशंकर यादव यांच्यासह व्यायामशाळेचे संचालक राजेंद्र गोतमारे, राजू इंगळे शिवा शिरसाट उपस्थित होते.