शिक्षकांना सेवा पुस्तिकेची दुय्यम प्रत देण्याचा शिक्षण विभागाचा आदेश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 12:42 IST2020-01-11T12:42:29+5:302020-01-11T12:42:37+5:30

राज्य खासगी प्राथमिक शिक्षक संघाने शिक्षण उपसंचालक अंबादास पेंदोर यांच्याकडे पाठपुरावा करून सेवा पुस्तिकेची दुय्यम प्रत उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.

Department of Education orders teachers to give secondary copy of service book! | शिक्षकांना सेवा पुस्तिकेची दुय्यम प्रत देण्याचा शिक्षण विभागाचा आदेश!

शिक्षकांना सेवा पुस्तिकेची दुय्यम प्रत देण्याचा शिक्षण विभागाचा आदेश!

अकोला: शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवा पुस्तिका, सेवा पट विनामूल्य देण्याबाबत आणि त्यामध्ये नोंदी घेऊन त्या साक्षांकित करण्याबाबत शासनाने तरतूद केली आहे. असे असतानाही शिक्षण विभागाकडून शिक्षकांना सेवा पुस्तिकेची दुय्यक प्रत मिळत नाही. त्यामुळे राज्य खासगी प्राथमिक शिक्षक संघाने शिक्षण उपसंचालक अंबादास पेंदोर यांच्याकडे पाठपुरावा करून सेवा पुस्तिकेची दुय्यम प्रत उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार शिक्षण उपसंचालकांनी पश्चिम वºहाडातील सर्वच शिक्षणाधिकाऱ्यांना सेवा पुस्तिकेची दुय्यम प्रत देण्याचे निर्देश दिले आहेत.
सेवा पुस्तिका हा प्रत्येक कर्मचाºयाचा महत्त्वाचा दस्तऐवज आहे. त्यामध्ये दरवर्षी वेतनवाढीसह कर्मचाºयाच्या नोकरीबाबत सर्व महत्त्वाच्या नोंदी ठेवण्यात येतात. सेवा पुस्तिका नसेल तर सेवानिवृत्ती, बदली, समायोजन करण्यास संबंधित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयाला अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांना शिक्षक लाभापासून वंचित राहावे लागते. त्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांना सेवा पुस्तिकेची दुय्यम प्रत उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने तरतूद केली आहे; परंतु शासनाच्या निर्णयाकडे शिक्षण विभागाने दुर्लक्ष केले आहे. शिक्षकांना सेवा पुस्तिकेची दुय्यम प्रत मिळत नव्हती. त्यामुळे शिक्षकांना त्यांच्या पगार वाढीची, यासह इतर नोंदीची माहिती मिळत नव्हती. ही समस्या राज्य खासगी प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष मनीष गावंडे यांनी अमरावती विभागाचे शिक्षण उपसंचालक अंबादास पेंदोर यांच्याकडे मांडली. तसेच त्यांना निवेदन देऊन शिक्षकांना सेवा पुस्तिकेची दुय्यम प्रत देण्याची मागणी केली होती. यासंदर्भात शिक्षण उपसंचालक अंबादास पेंदोर यांनी पश्चिम वºहाडातील सर्वच प्राथमिक शिक्षणाधिकाºयांना निर्देश देऊन शिक्षकांना सेवा पुस्तिकेची दुय्यम प्रत देण्यास बजावले आहे. सोबतच त्यांनी यासंदर्भात काय कार्यवाही केली, याचा अहवालसुद्धा सादर करण्याचे निर्देश शिक्षणाधिकाºयांना दिले आहेत. (प्रतिनिधी)

 

Web Title: Department of Education orders teachers to give secondary copy of service book!