बिंदू नामावली सादर करताना शिक्षण विभागाकडून मागासवर्ग कक्षाची दिशाभूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 14:42 IST2018-04-18T14:38:10+5:302018-04-18T14:42:12+5:30
अकोला : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने बिंदू नामावली सादर करताना अमरावती विभाग मागासवर्ग कक्षाची दिशाभूल करून मंजुरी घेतली. त्यामध्ये शिक्षकांचे आर्थिक शोषण करत भ्रष्टाचार करण्यात आला.

बिंदू नामावली सादर करताना शिक्षण विभागाकडून मागासवर्ग कक्षाची दिशाभूल
अकोला : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने बिंदू नामावली सादर करताना अमरावती विभाग मागासवर्ग कक्षाची दिशाभूल करून मंजुरी घेतली. त्यामध्ये शिक्षकांचे आर्थिक शोषण करत भ्रष्टाचार करण्यात आला. काही अधिकारी-शिक्षकांना कारवाईतून वाचवण्यासाठी प्रस्तावात संपूर्ण माहिती न देता दडवण्यात आली. त्याबाबतचे पुरावे असून, या भ्रष्टाचाराचा लवकरच पर्दाफाश केला जाईल, असा इशारा साने गुरुजी शिक्षक सेवा संघाचे अध्यक्ष दिलीप अंधारे यांनी पत्रकातून दिला.
मराठी शिक्षकांच्या बिंदू नामावलीचा प्रस्ताव सादर करताना शिक्षण विभागाने वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल केली. सोबतच मागासवर्ग कक्षाला संपूर्ण माहिती दिली नाही. काही प्रकरणात खोट दस्तऐवज सादर करण्यात आले. त्यातून बिंदू नामावलीत अपात्र ठरणाºया शिक्षकांना मूळ बिंदूतून अपात्र ठरण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. काही शिक्षकांच्या जातीच्या संवर्गातच बदल करण्यात आले. त्यातून बिंदू नामावलीचा प्रस्ताव तयार करताना मोठ्या प्रमाणात शिक्षकांचे आर्थिक शोषण करण्यात आले. शिक्षण विभागातील संबंधित अधिकारी-कर्मचारी यांनी बनावट दस्तऐवज सादर करून मागासवर्ग कक्षाकडून बिंदू नामावली मंजूर करून घेतली. शिक्षकांचे सातत्याने आर्थिक शोषण झाल्याने गेल्या महिन्यात लाचलुचपत विभागाने कारवाई केली. हा प्रकार भ्रष्टाचाराचा असल्याचे त्यातून सिद्ध झाले. विशेष म्हणजे, त्या भ्रष्टाचाराचे संपूर्ण पुरावे सेवा संघाकडे उपलब्ध आहेत, त्याचा पर्दाफाश करण्यासाठी लवकर तक्रार करण्याचा इशारा अंधारे यांनी पत्रकात दिला आहे.