शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला शहरात डेंग्यूसदृश साथीचा फैलाव; हिवताप विभाग निष्क्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 10:53 IST

Akola Municipal Coroporation मनपाची निष्क्रियता लक्षात घेता आगामी दिवसांत डेंग्यूच्या रुग्ण संख्येत वाढ होणार असल्याची शक्यता आहे.

अकोला : संसर्गजन्य कोरोना विषाणूची साथ, त्यात भरीस भर शहरात ठिकठिकाणी साचलेले पाणी व त्यात निर्माण झालेल्या डासांच्या उत्पत्तीमुळे शहरात डेंग्यूसदृश आजाराची साथ पसरल्याचे समोर आले आहे. मनपाची निष्क्रियता लक्षात घेता आगामी दिवसांत डेंग्यूच्या रुग्ण संख्येत वाढ होणार असल्याची शक्यता आहे. संभाव्य परिस्थिती लक्षात घेता प्रभागांमध्ये धुरळणी (फॉगिंग)ला खो देत मनपाचा हिवताप कुंभकर्णी झोपेत असल्याचे चित्र आहे.

मागील चार वर्षांपासून अकोलेकरांना डेंग्यूसदृश आजाराने हैराण करून सोडले आहे. घरातील फ्रीज, कुलर, शोभिवंत फुलांची कुंडी, पाण्याची टाकी तसेच अनेक दिवसांपासून साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होते. एडिस एजिप्ताय या डासाने चावा घेतल्यास डेंग्यूचा फैलाव होतो. डेंग्यू किंवा मलेरिया झालेले अनेक रुग्ण शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल न होता खासगी रुग्णालयात दाखल होतात. शहरातील काही खासगी रुग्णालयांत डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. आगामी दिवसांत अशा रुग्णांच्या संख्येत वाढ होणार असल्याची भीती वर्तविली जात आहे. जीवघेण्या डेंग्यूचा धोका ओळखून महापालिकेच्या मलेरिया विभागासह वैद्यकीय आरोग्य यंत्रणेने वेळीच उपाययोजना राबवणे अपेक्षित असताना संबंधित विभाग कमालीचे निष्क्रिय ठरत असल्याचे दिसून येत आहे. डासांची पैदास रोखण्यासाठी प्रभागांमध्ये तसेच घराघरांमध्ये धुरळणी करणे व साचलेल्या पाण्यांमध्ये औषध फवारणी करून पाणी वाहते करण्यासाठी महापालिका प्रशासनाने प्रभावी मोहीम राबवण्याची गरज असताना हिवताप विभागाने झोपेचे सोंग घेतल्याचे चित्र आहे.

 

रुग्ण डेंग्यूसदृश असला तरीही...

डेंग्यूची लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांची दोन प्रकारे चाचणी केली जाते. ‘रॅपिड’चाचणीचे तीन प्रकार असून तीनपैकी कोणतीही चाचणी ‘पॉझिटिव्ह’आल्यास तो रुग्ण डेंग्यूसदृश समजला जातो. तसेच ‘एलेन्झा’चाचणी केली असेल तर त्या रुग्णाला डेंग्यू झाल्याचे निश्चित मानले जाते. ‘रॅपिड’चाचणीद्वारे डेंग्यूसदृश रुग्ण आढळला तरीही त्याच्यावर मात्र डेंग्यूच्या रुग्णाप्रमाणेच उपचार केले जातात, हे येथे उल्लेखनीय.

हिवताप विभागाकडे अवघ्या सात ते आठ फॉगिंग मशीन आहेत. त्यामुळे प्रभागात धुरळणीसाठी चार-चार महिने प्रतीक्षा करावी लागते. फवारणी दैनंदिन करणे अपेक्षित आहे. डासांपासून होणारे आजार पाहता उपाययोजनेसाठी मलेरिया विभाग निष्क्रिय ठरला आहे.

-राजेश मिश्रा, गटनेता शिवसेना

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाdengueडेंग्यू