डोंगरगावात डेंग्यूसदृश तापाचे रुग्ण

By Admin | Updated: June 5, 2014 20:53 IST2014-06-05T18:34:12+5:302014-06-05T20:53:35+5:30

अकोला तालुक्यातील डोंगरगावात डेंग्यूसदृश तापाचे रुग्ण आढळून आले आहेत.

Dengue fever in Dongargaa | डोंगरगावात डेंग्यूसदृश तापाचे रुग्ण

डोंगरगावात डेंग्यूसदृश तापाचे रुग्ण

डोंगरगाव : अकोला तालुक्यातील डोंगरगावात डेंग्यूसदृश तापाचे रुग्ण आढळून आले आहेत. यापूर्वी याच गावात डेंग्यूच्या तापाने दोघांचा बळी गेला होता. त्यानंतरही कोणत्याही उपाययोजना न करण्यात आल्यामुळे येथे डेग्यूने पुन्हा डोके वर काढले आहे. गावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. नाल्यांची नियमितपणे सफाई होत नसल्यामुळे अनेक ठिकाणी पाण्याचे डबके साचलेले आहेत. त्यामुळे रोगराईची समस्या वाढली आहे. काही दिवसांपूर्वी येथील एक बालक व वृद्धाचा डेंग्यूच्या तापाने मृत्यू झाला होता. आता पुन्हा गावातील काही बालके तापाने फणफणत आहेत. त्यातील एका बालिकेला डेंग्यूचा ताप असल्याचे निष्पन्न झाले आहे. संबंधित यंत्रणेने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: Dengue fever in Dongargaa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.