शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
4
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
5
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
6
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
7
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
8
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
9
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
10
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
11
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
12
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
13
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
14
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
15
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
16
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
17
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
18
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
19
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
20
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

युवतीची फसवणूक करणारे दिल्लीतील ठग जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 3:05 PM

आॅनलाइन फसवणूक करणाऱ्या दिल्लीतील दोन ठगांना खदान पोलिसांनी शुक्रवारी अटक केली.

अकोला: आदर्श कॉलनी येथील रहिवासी तसेच बी. कॉम.चे शिक्षण घेत असलेल्या युवतीची बिझनेस लोनच्या नावाखाली कर्ज मंजुरीसाठी ७८ हजार ५०० रुपयांनी आॅनलाइन फसवणूक करणाऱ्या दिल्लीतील दोन ठगांना खदान पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना २६ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. विनोद संतासिंग चौहान आणि मोसम वासुराम दोघेही रा. जमनीया जिल्हा गाझीपूर दिल्ली असे अटक केलेल्या ठगांची नावे आहेत.आदर्श कॉलनीतील काजोल हिने तिच्या मोबाइलवर बिझनेस लोन मिळेल का, म्हणून सर्च केले. तेव्हा तिला क्वीक अ‍ॅण्ड ईझी फायनान्स नावाची लिंक प्राप्त झाली. ती ओपन केल्यानंतर दुसºयाच दिवशी दिव्या नामक महिलेचा फोन आला. तुम्ही आमच्या लिंकला भेट दिली म्हणून आम्ही तुम्हाला लोन देऊ शकतो, असे दिव्याने काजोलला सांगितले. दिव्या नामक महिलेने काजोलच्या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर एक केवायसी फॉर्म पाठविला व तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्याचे आमिष दिले. तिने केवायसी फॉर्म भरून पुन्हा त्याच व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविला व मागणीनुसार आधार कार्ड, पॅनकार्ड, बँक पासबुकचे फोटो पाठविले. फॉर्म फी म्हणून तिने दिलेल्या फिनो बँक खात्यामध्ये २४ जून रोजी तीन हजार रुपये भरले. त्यानंतर दिव्याने सांगितल्यानुसार तिच्या साहेबांचा व्हेरिफिकेशनसाठी काजोलला फोन आला. एक लाख रुपयांचे लोन मंजूर झाल्याचे त्याने सांगितले; मात्र लोनची ट्रान्सफर फी म्हणून २१ हजार रुपये भरावी लागेल. लोनसोबत ती रक्कम परत येईल, असा विश्वास दिला. यावर विश्वास बसल्याने काजोलने फिनो बँकेचे त्याच खात्यावर २१ हजार रुपये पुन्हा भरले. त्यानंतर त्याच रेफरन्सने बँक फायनान्स संदर्भात वेगवेगळे कारण देत ७८ हजार ५०० रुपये काजोलकडून उक ळण्यात आले. त्यानंतरही पुन्हा ‘एनओसी’साठी २६ हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याने काजोलला तिची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे तिने खदान पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत व फसवणुकीचे गुन्हे दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला. सायबर सेलच्या मदतीने एक पथक दिल्लीत तळ ठोकून बसले. त्यांनी येथील दोघांना ताब्यात घेऊन अकोल्यात आणले असता आरोपींनी पैसे उकळल्याची कबुली दिली असून, न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी