शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
5
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
6
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
7
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
8
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
9
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
10
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
11
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
12
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
13
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
14
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
15
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
16
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
17
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
18
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
19
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
20
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज

शाळांचा निर्णय; शिक्षण विभागाचे कानावर हात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 10:12 AM

शाळा समित्यांनी निर्णय घेण्यास सांगितले; परंतु शाळा सुरू करण्याविषयी सर्वच शाळांमधील समित्या इच्छुक नसल्याचे दिसून येत आहे.

- नितीन गव्हाळे लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १,३00 च्यावर पोहोचली आहे आणि मृत्यूचे प्रमाणसुद्धा वाढले आहे. अशा स्थितीत शाळा सुरू करणे विद्यार्थी आणि शिक्षकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून घातक ठरणार आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्यासाठी कानावर हात ठेवत, शाळा समित्यांकडे बोट दाखविले असून, शाळा समित्यांनी निर्णय घेण्यास सांगितले; परंतु शाळा सुरू करण्याविषयी सर्वच शाळांमधील समित्या इच्छुक नसल्याचे दिसून येत आहे. येत्या काळात शाळांमधील विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला तर त्याची जबाबदारी कोण घेईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.शासनाने प्रत्येक जिल्ह्यातील कोरोना विषाणूची स्थिती पाहून, शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मार्गदर्शक सूचनासुद्धा दिल्या आहेत. त्या अनुषंगाने शाळा सुरू करण्याबाबत माध्यमिक व प्राथमिक विभाग संभ्रमात आहेत. शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय शाळा समित्यांकडे सोपविला आहे; परंतु अनेक शाळांमधील समित्यांनी जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. त्यामुळे आम्ही काय निर्णय घ्यावा, शाळा सुरू केली आणि विद्यार्थी, शिक्षकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला तर जबाबदारी कोण घेईल, असा प्रश्न उपस्थित केला आहे. येत्या काळामध्ये शाळांमधून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर शाळा समित्यांना किंवा संबंधित शाळा, मुख्याध्यापकांना जबाबदार धरण्यात येईल. शिक्षण विभागाने ही बाब ओळखूनच हा निर्णय शाळा समित्यांवर सोपविल्याचे दिसून येते. त्यामुळे कोणतीही शिक्षण संस्था सध्या तरी शाळा सुरू करण्याच्या बाबतीत तयार होत नाही. शिक्षण संस्थाचालकांसह विज्युक्टानेसुद्धा शाळा सुरू करण्यास विरोध दर्शविला आहे.शिक्षण संस्थाचालकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन शिक्षण संस्था संचालक मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारी दिलेल्या निवेदनात, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्यास शाळांना पालक व समाजाच्या रोष सहन करावा लागेल. स्थिती नियंत्रणात आल्यानंतरच शाळांचे निर्जंतुकीकरण करून शाळा सुरू करण्याचा विचार करावा.

विज्युक्टाचाही शाळा सुरू करण्यास विरोधविदर्भ ज्युनिअर कॉलेज टिचर्स असोसिएशनने शिक्षण आयुक्तांना शनिवारी पाठविलेल्या निवेदनात शाळा-कनिष्ठ महाविद्यालये सुरू करण्यास विरोध केला आहे. शिक्षकांना घरी काम देऊन तो कर्तव्यकाळ समजावा, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, शाळांवर निर्णय ढकलणे चुकीचे आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबत संभ्रम दूर करण्याची मागणी विज्युक्टाचे प्रांताध्यक्ष प्रा. डॉ. अविनाश बोर्डे, महासचिव डॉ. अशोक गव्हाणकर यांनी केली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाEducation Sectorशिक्षण क्षेत्रcorona virusकोरोना वायरस बातम्या