लडाखमध्ये ट्रेकिंग करताना आकोटच्या युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2017 13:10 IST2017-06-24T12:46:33+5:302017-06-24T13:10:20+5:30
आकोट येथील रहिवासी निखिल चांडकचा लेहलदाख येथे ट्रेकिंगदरम्यान खोल दरीत कोसळून मृत्यू झाला आहे.

लडाखमध्ये ट्रेकिंग करताना आकोटच्या युवकाचा मृत्यू
>ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 24 - अकोट येथील रहिवासी निखिल चांडकचा लेहलदाख येथे ट्रेकिंगदरम्यान खोल दरीत कोसळून मृत्यू झाला आहे. निखिल हा एसपी जैन इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च व यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा (नागपूर) विद्यार्थी होता.
लेहलदाख येथे ट्रेंकिंग करत असताना निखिल 350 खोल दरीत कोसळला. या घटनेत त्याचा मृत्यू झाला. हेलिकॉप्टरच्या सहाय्याने दरीत पडलेल्या निखिलचा शोध घेण्यात आला. हा येथील चांडक कन्स्ट्रक्शनचे मालक संतोष चांडक यांचा मुलगा.
निखिलच्या मृत्यूमुळे चांडक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.