विजेच्या धक्क्याने युवा शेतकऱ्याचा मृत्यू

By Admin | Updated: April 9, 2017 20:41 IST2017-04-09T20:41:42+5:302017-04-09T20:41:42+5:30

तेल्हारा : शेतात शिप बदलताना शॉक लागून युवा शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना ९ एप्रिल रोजी उकळी बु. येथे घडली.

Death of a young farmer by electric shock | विजेच्या धक्क्याने युवा शेतकऱ्याचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने युवा शेतकऱ्याचा मृत्यू

तेल्हारा : शेतात शिप बदलताना शॉक लागून युवा शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना ९ एप्रिल रोजी उकळी बु. येथे घडली.
तेल्हारा शहराजवळ असलेल्या उकळी बु. ता. संग्रामपूर येथील अमोल गजानन व्यवहारे हा युवा शेतकरी रविवारी सकाळी शेतात पाणी देण्यासाठी गेला होता. दरम्यान, शिप बदलत असताना पाण्यात वीज प्रवाह आल्याने त्याला जोरदार धक्का बसला. ही बाब लक्षात येताच त्याला तातडीने तेल्हारा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉ. तापडिया यांनी तपासणी करून युवकाला मृत घोषित केले. या प्रकरणाची माहिती तेल्हारा पोलिसांना देण्यात आली. तेल्हारा पोलिसांनी पंचनामा करून संग्रामपूर पोलिसांना माहिती दिली.

Web Title: Death of a young farmer by electric shock