शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

जीनिंग फॅक्टरीत कन्व्हेअर बेल्टमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 17:04 IST

बार्शीटाकळी (जि. अकोला): येथील एका जिनिंग फॅक्टरीत सरकी लोटत असताना कन्व्हेअर बेल्टमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू झाला.

बार्शीटाकळी (जि. अकोला): येथील एका जिनिंग फॅक्टरीत सरकी लोटत असताना कन्व्हेअर बेल्टमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना जे.एस.कॉटन या जिनिंग फॅक्टरीमध्ये २६ डिसेंबरच्या पहाटे घडली. रोशन दादाराव खंडारे (२१)असे मृतक मजुराचे नाव आहे.बार्शीटाकळी येथील जे.एस.कॉटन जीनिंग फॅक्टरीमध्ये रोशन खंडारे हा युवक २५ डिसेंबर रोजी कन्व्हेअर बेल्टवर सरकी लोटण्याचे काम करीत होता. मध्यरात्री १.१० मिनीटांनी सरकी लोटत असताना तो कन्व्हेअर बेल्टमध्ये अडकला. ही घटना इतर कामगार व यंत्र चालकांच्या लक्षात येताच त्यांनी मशिन बंद केली. गंभीर अवस्थेत रोशनला अकोल्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तो अत्यवस्थ असल्याने त्याला सर्वोपचार रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, वाटेतच त्याचा मृत्यू झाला. रात्रपाळीत काम करीत असलेल्या अक्षय रामायणे, गौरव भटकर, अरुण मांडवगळे, शिवदास वानखडे, गजानन सावळे यांनी जखमी रोशनला तातडीने हलवले. जिनिंगमध्ये मजुरांच्या सुरक्षेसाठी कुठलीही उपाय योजना करण्यात आली नसल्याचे हा अपघात घडल्याचे समोर येत आहे. ही जिनिंग फॅक्टरी सुबोध गोयनका यांच्या मालकीची आहे. या प्रकरणी बार्शीटाकळी पोलिसात वृत्त लिहीस्तोवर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.मृतक रोशनच्या मागे आई, वडील, एक भाउ, एक बहीण व आप्त परिवार आहे. (शहर प्रतिनिधी)

टॅग्स :AkolaअकोलाBarshitakliबार्शिटाकळीAccidentअपघात