दुचाकीवरून पडल्याने महिलेचा मृत्यू
By Admin | Updated: June 30, 2014 01:54 IST2014-06-30T01:15:56+5:302014-06-30T01:54:01+5:30
मोटारसायकलवरील नियंत्रण सुटल्याने महिलेचा खाली पडून मृत्यू झाल्याची घटना पातूर रोडवर घडली.

दुचाकीवरून पडल्याने महिलेचा मृत्यू
अकोला: मोटारसायकलवरील नियंत्रण सुटल्याने महिलेचा खाली पडून मृत्यू झाल्याची घटना दुपारी १ वाजताच्या सुमारास पातूर रोडवर घडली. याप्रकरणी उशिरा रात्रीपर्यंत जुने शहर पोलिसांनी नोंद केली नव्हती.
जठारपेठेतील केला प्लॉटमध्ये राहणारे श्रीराम गुल्हाने व त्यांच्या पत्नी कुसूम गुल्हाने हे रविवारी सकाळी १0 वाजता मोटारसायकलने पातूर रोडवरील संत आसाराम बापू आश्रमामध्ये सत्संगासाठी गेले होते. येथून दुपारी परत येत असताना रोडवरील खड्डा चुकविताना श्रीराम गुल्हाने यांचे मोटारसायकलवरील नियंत्रण सुटले. मोटारसायकल घसरून पडल्याने कुसूम गुल्हाने या खाली कोसळल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु डॉक्टरांनी त्या मरण पावल्याचे सांगितले. कुसूम गुल्हाने यांचा मुलगा र्जमनी येथे असतो. सोमवारी दुपारी ४ वाजता त्यांच्या केला प्लॉटमधील निवासस्थानहून कुसूम गुल्हाने यांची अंत्ययात्रा निघणार आहे.