अपघातातील महिलेचा मृत्यू ; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

By Admin | Updated: July 10, 2017 02:20 IST2017-07-10T02:20:54+5:302017-07-10T02:20:54+5:30

अकोला : दहीहांडा येथील युवकाच्या दुचाकी वाहनाच्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Death of a woman in an accident; Faulty man's crime | अपघातातील महिलेचा मृत्यू ; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

अपघातातील महिलेचा मृत्यू ; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

अकोला : दहीहांडा येथील युवकाच्या दुचाकी वाहनाच्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. महिला दहीहांड्याजवळील गौलखेड येथील रहिवासी असून, याप्रकरणी अकोट फैल पोलीस ठाण्यात वाहनचालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहीहांडा येथील रहिवासी सुरेश रामदास डाबेराव १७ जून रोजी संध्याकाळी ५ वाजता त्यांची आई राजकन्या रामदास डाबेराव हे दोघे अकोल्यातील रुग्णालयात भरती असलेल्या पुतण्याला पाहण्यासाठी दुचाकीने येत होते. अकोट रोडवर त्यांना एका वाहनाने धडक दिली. त्यात सुरेश यांची आई गंभीर जखमी झाली. उपचारादरम्यान २१ जून रोजी त्यांच्या आईचा मृत्यू झाला. याप्रकरणी सुरेश डाबेराव यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सदर वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Death of a woman in an accident; Faulty man's crime