अकोट तालुक्यातील वारकर्‍याचा अपघातात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 01:55 AM2017-11-04T01:55:58+5:302017-11-04T01:56:29+5:30

अकोट : तालुक्यातील संत भास्कर महाराज पायदळ दिंडीसोबत आळंदी येथे गेलेल्या नेव्होरी बु. येथील पांडुरंग विठोबा लोणकर या वारकर्‍याला दुचाकीने उडविले. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. सदर घटना औरंगाबाद-नगर मार्गावर ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता घडली. 

Death of Warakaris in Akot taluka | अकोट तालुक्यातील वारकर्‍याचा अपघातात मृत्यू

अकोट तालुक्यातील वारकर्‍याचा अपघातात मृत्यू

Next
ठळक मुद्देअहमदनगरजवळ दुचाकीने उडविले!

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोट : तालुक्यातील संत भास्कर महाराज पायदळ दिंडीसोबत आळंदी येथे गेलेल्या नेव्होरी बु. येथील पांडुरंग विठोबा लोणकर या वारकर्‍याला दुचाकीने उडविले. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. सदर घटना औरंगाबाद-नगर मार्गावर ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता घडली. 
संत गजानन महाराज यांचे पट्टशिष्य संत भास्कर महाराज यांची कार्तिक वारी आळंदी येथे अकोली जहागीर येथून २२ ऑक्टोबर रोजी रवाना झाली. या पायदळ दिंडीसोबत नेव्होरी बु. येथील ६५ वर्षीय पांडुरंग विठोबा लोणकर हे गेले होते. ३ नोव्हेंबर रोजी अहमदनगरमध्ये पोहचत असताना डीएसपी चौकाजवळ एका दुचाकीस्वाराने धडक दिली. या अपघातात जखमी झालेल्या पांडुरंग लोणकर यांना सिव्हिल हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले. याठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सदर दिंडी ही अहमदनगरमधील माळीवाडा येथे मुक्कामी थांबली आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. पांडुरंग लोणकर यांचा मृतदेह आणण्याकरिता संस्थेचे अध्यक्ष हभप अशोक महाराज जायले व अन्य वारकरी रवाना झाले आहेत.

Web Title: Death of Warakaris in Akot taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.