वाडेगाव येथे सोयाबीनच्या झाडांची काढली प्रेतयात्रा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 19:36 IST2017-09-03T19:34:48+5:302017-09-03T19:36:10+5:30
वाडेगाव परिसरात यावर्षी पावसाने दडी मारल्याने व िपकावर अळ्यांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकर्यांच्या शेतातील सोयाबीनच्या झाडांना शेंगाच लागल्या नाहीत. त्यामुळे आ िर्थकदृष्ट्या संकटात सापडलेल्या शेतकर्यांनी जिल्हा प्रशासनाकडे अनेक ठिकाणी निवेदने दिली. परंतु, प्रशासनाने त्याची दखल घे तली नसल्याने वाडेगाव परिसरातील संतप्त शेतकर्यांनी ३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद शाळेपासून मैदानापयर्ंत रस्त्यावर उतरून सोयाबीनच्या झाडांची प्रेतयात्रा काढून प्रतीका त्मक आंदोलन केले.

वाडेगाव येथे सोयाबीनच्या झाडांची काढली प्रेतयात्रा!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाडेगाव : वाडेगाव परिसरात यावर्षी पावसाने दडी मारल्याने व िपकावर अळ्यांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकर्यांच्या शेतातील सोयाबीनच्या झाडांना शेंगाच लागल्या नाहीत. त्यामुळे आ िर्थकदृष्ट्या संकटात सापडलेल्या शेतकर्यांनी जिल्हा प्रशासनाकडे अनेक ठिकाणी निवेदने दिली. परंतु, प्रशासनाने त्याची दखल घे तली नसल्याने वाडेगाव परिसरातील संतप्त शेतकर्यांनी ३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद शाळेपासून मैदानापयर्ंत रस्त्यावर उतरून सोयाबीनच्या झाडांची प्रेतयात्रा काढून प्रतीका त्मक आंदोलन केले.
या प्रेतयात्रेत प्रत्येक शेतकर्याच्या हातात सोयाबीनचे झाड असल्याचे दिसून आले. अंत्ययात्रेप्रमाणेच समोर एकजण तिरडी घेऊन चालत होता. हजारोंच्या संख्येने शेतकरी या अभिनव आंदोलनात सहभागी झाले. सरकारविरोधात घोषणाबाजी करत ही प्रेतयात्रा संपूर्ण गावात फिरविण्यात आली. या प्रेतयात्रेत ‘सरकार आमचे आसू पुसणार का?’, ‘सोयाबीन खल्लास तर शे तकरी खल्लास!’ असे अनेक फलक फडकवित व विविध घोषणा देत ही प्रेतयात्रा गावातून काढून बेसिक शाळेच्या मैदानात त्या प्रेताला मुखाग्नी देण्यात आली. यावेळी सर्वांनी श्रद्धांजली अ र्पण केली. वाय. एस. पठाण, प्रकाश कंडरकर, रमेश बावणे, गुलाम रसूल, अहमद शेख इब्राहिम शेख, जिल्हा परिषद सदस्य डॉ. हिंमतराव घाटोळ, श्यामलाल लोध, सदानंद भुस्कुटे, राजू अवचार, शरद सरप, अरुण घाटोळ राजकुमार घाटोळ, पप्पू संगोकार, पांडुरंग कातखेडे, गोपाळ काळे, गोपाल दशमुखे, गुलाब लोखंडे, सुभाष जढाळ, विनायक पोटदुखे, शेख अनिस, प्रकाश पटीलखेडे, सागर सरप, माजी उपसरपंच सईद अली व गावातील वृद्ध शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.