रूग्णाचा मृत्यू; सवरेपचारमध्ये तोडफोड
By Admin | Updated: August 28, 2014 01:46 IST2014-08-28T01:27:53+5:302014-08-28T01:46:45+5:30
संतप्त नातेवाइकांनी सवरेपचार रुग्णालयामध्ये तोडफोड केली.

रूग्णाचा मृत्यू; सवरेपचारमध्ये तोडफोड
अकोला - शहरातील चवरे प्लॉट येथील रहिवासी इसमाच्या छातीत दुखत असल्याने त्याला तातडीने सवरेपचार रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करताच इसमाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. यामुळे संतप्त झालेल्या त्याच्या नातेवाईकांनी बुधवारी सायंकाळी सवरेपचार रुग्णालयामध्ये तोडफोड केली.
चवरे प्लॉट येथील रहिवासी संतोष उत्तम सपकाळ हे त्यांचा मित्र सुधीर मगर याच्यासोबत जिल्हाधिकारी अरूण शिंदे यांच्या निवासस्थानी प्लंबिंगचे काम करण्यासाठी गेले होते. यावेळी संतोष सपकाळ यांच्या छातीत दुखल्याने मगर यांनी सपकाळ याला तातडीने एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले. येथील डॉक्टरांनी संतोष सपकाळ यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
यावर मगर यांना विश्वास न बसल्याने त्यांनी सपकाळ यांना तातडीने सवरेपचार रुग्णालयामध्ये उपचारासाठी आणले; मात्र येथील डॉक्टरांनी संतोष सपकाळ यांची तपासणी केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. यावरून संतप्त झालेल्या त्यांच्या नातेवाईकांनी सवरेपचार रुग्णालयातील अपघात कक्षामध्ये असलेल्या काचेच्या दरवाजाची तोडफोड केली. हा प्रकार सवरेपचार रुग्णालयात असलेल्या पोलिसांना माहिती पडताच त्यांनी मृतकाच्या नातेवाईकांना समजावून सांगितले. त्यानंतर मृतदेह सपकाळ कुटुंबीयांच्या ताब्यात देऊन प्रकरण मिटविले.