The death of a laborer under a debries at Balapur | बाळापूर येथे वाळूची दरड कोसळली; ढिगाऱ्याखाली दबून मजुराचा मृत्यू
बाळापूर येथे वाळूची दरड कोसळली; ढिगाऱ्याखाली दबून मजुराचा मृत्यू

ठळक मुद्देशेख सलीम शेख तालिब (२७)असे या मजुराचे नाव आहे. बेलदारपुरा भागातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. मजुरांनी त्याला बाहेर काढले; परंतु तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती.

बाळापूर : तालुक्यातील सातरगाव येथे नदीपात्रात वाळूसाठी खोदकाम करताना दरड कोसळून ढिगाºयाखाली दबल्याने एक मजुर मृत्यूमुखी पडल्याची घटना मंगळवारी घडली. शेख सलीम शेख तालिब (२७)असे या मजुराचे नाव असून, तो बाळापूर येथील बेलदारपुरा भागातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. 
बाळापूर तालुक्यातील नद्यांच्या पात्रांमधून मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा केला जातो. सातरगाव येथील नदीपात्रात वाळू काढण्यासाठी खोदकाम सुरु आहे. या ठिकाणी शेख सलीम शेख तालीब हा मंगळवारी वाळू काढण्याचे काम करीत होता. काम सुरु असताना अचानक वाळूची मोठी दरड कोसळली. शेख सलीम शेख तालीब हा दरडीच्या ढिगाºयाखाली दबला. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या इतर मजुरांनी त्याला बाहेर काढले; परंतु तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती.


Web Title: The death of a laborer under a debries at Balapur
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.